Nayanthara : नयनताराकडे खासगी जेटसह आलिशान गाड्या

नयनताराकडे खासगी जेटसह आलिशान गाड्या
nayanthara
नयनताराकडे खासगी जेटसह आलिशान गाड्याnayanthara
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाहेरच्या व्यक्तीला सिनेसृष्टीत स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष आणि अडचणीचा सामना करावा लागतो. काहींना यश मिळते, तर काहीच्या पदरी निराशा पाडते. पण, आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक अभिनेत्रीनी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली जाहे, ती अभिनेत्री म्हणजे नयनतारा. आता तिचा बॉलीबुड दाक्षिणात्य सिनेजगतात बोलबाला आहे.

नयनताराला लेडी सुपरस्टार म्हणून दक्षिणेत ओळखले जाते. आता ती पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगताना दिसत आहे. सध्या नयनतारा कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीन आहे. देशातील अनेक शहरांमध्ये तिची संपत्ती आहे. २०२२ मध्ये नयनताराने खासगी जेट खरेदी केले आहे. तिच्या घराची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. केवळ वयाच्या ४० वर्षी नयनताराची गडगंज संपत्ती आहे. अभिनेता शाहरूख खानसोबत नयनताराने 'जवान' या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली.

वयाच्या २० व्या वर्षी नयनताराने कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने कधीच मागे काढून पाहिले नाही. नयनताराचा हैदराबादमध्ये आलिशान बंगला आहे. लग्नानंतर ती पतीसोबत चेन्नईतील चार बीएचके फ्लॅटमध्ये राहते. या फ्लॅटची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. नयनतारा एका सिनेमासाठी १२ कोटी रुपयांचे मानधन आकारते, तर एका ब्रँड प्रमोशनसाठी ती ४ ते ५ कोटी रुपये घेते. नयनताराच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्याही आहेत.

image-fallback
पुणे : डीएसके यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news