खऱ्या अर्थाने जेव्हा निसर्गाला सुध्दा नव चैतन्य प्राप्त होते, तो खरा सण : अक्षया देवधर 

खऱ्या अर्थाने जेव्हा निसर्गाला सुध्दा नव चैतन्य प्राप्त होते, तो खरा सण : अक्षया देवधर 
Akshaya Deodhar
खऱ्या अर्थाने जेव्हा निसर्गाला सुध्दा नव चैतन्य प्राप्त होते, तो खरा सण : अक्षया देवधर Akshaya Deodhar

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमूळे घराघरात पोहचलेल्या अक्षया देवधरची (Akshaya Deodhar) एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने इंन्स्टाग्रामला काही आपले फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरुन कॉमेंट केल्या आहेत.

Akshaya Deodhar – निसर्गाला सुध्दा नव चैतन्य प्राप्त होते, तो खरा हा सण

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अक्षया देवधरची (Akshaya Deodhar) अंजली (पाठकबाई) ही भूमिका खुप गाजली, त्निने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटला फोटो पोस्ट केले आहेत व लिहले आहेत की, "खऱ्या अर्थाने जेव्हा निसर्गाला सुध्दा नवचैतन्य प्राप्त होते, तो खरा हा सण. निसर्ग आणि प्राणी यांचे मनुष्य जीवनात असणारे अनन्यसाधारण महत्त्‍व साजरा करणारी आपली ही परंपरा आहे, झाडाला जशी नवीन पालवी फुटावी तसाच बोध घेउन चैत्र पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरूवात आपण करतो. साडेतीन मुहुर्तापैकी एका मुहुर्ताचे महत्त्‍व देतो. नकारात्मकता बाजूला सारुन सकारात्मकतेने त्यावर विजय मिळवावा, ही शिकवण घेतो.

शौर्य, पराक्रम, वात्सल्य, भूत-दया आणि अक्षय असलेल्या आपल्या मराठी संस्कृतीचा अनोखा संगम, पवित्र अशा गुढीपाडवा सणाला आपण साजरा करुया अक्षया संगे…"

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news