

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने पुन्हा तिच्या कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नताशाचे अल्बम साँग प्रदर्शित झाले होते. त्यानंतर नुकतेच आता नताशाने एका सोहळ्याला हजेरी लावली होती. यातील तिचा व्हिडीओ समोर आला आहे. नताशा या सोहळ्याला ग्लॅमरस लूकमध्ये हजर होती; पण तिच्या आऊटफिटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. (Natasa Stankovic )
या व्हिडीओत नताशा काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये बघायला मिळत आहे. पापाराझींना फोटोसाठी नताशाने पोझही दिल्याचे पाहण्यास मिळत आहे; पण नताशाचा हा लूक मात्र नेटकऱ्यांना आवडलेला नाही. नताशाला पाहून नेटकऱ्यांना अभिनेत्री उर्फी जावेद हिची आठवण झाली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे, हा तर उर्फी बनायचा प्रयत्न अशी एकाने, तर उर्फीकडून प्रेरणा घेतली आहेस काय? अशी दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली आहे. नताशाची उर्फीसोबत तुलना करत आहे. तू काही चांगली दिसत नाहीस, हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर नताशा खूपच सक्रिय झाली असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. पॉप शिमगत बादशहा याच्या 'डीजेवाले बाबू' गाण्यातून नताशा लोकप्रियता मिळाली. (Natasa Stankovic)