

नर्गिस फाखरी ही सध्या खूपच चर्चेत आहे, याचे कारण म्हणजे तिची बहीण आलिया फाखरीचे नाव तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्सच्या हत्येच्या आरोपांमध्ये समोर आले आहे. नर्गिसने या चर्चेदरम्यान पहिल्यादांच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. नर्गिसने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये नर्गिसने एक फोटो पोस्ट केला असून, त्याला कॅप्शन दिले आहे या फोटोमध्ये ती 'हाऊसफुल-५' या चित्रपटातील सोनम बाजवा आणि जॅकलिन फर्नाडिस या अभिनेत्रींबरोबर दिसत आहे. या फोटोला तिने आम्ही येतोय ! असे कॅप्शन दिले आहे. 'हाऊसफुल-५' या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खानसह अनेक कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, नर्गिसच्या बहिणीवर तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर एडवर्ड जेकब्स याच्या हत्येचा आरोप आहे. तिला न्यूयॉर्कमधून अटक करण्यात आली आहे. आलियावर दोन मजली गॅरेजला आग लावून एडवर्डचा आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप आहे. तिला जामीन नाकारला आहे; पण आलियाने कोर्टात आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे.