

पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतातील प्रमुख आयटी कंपनी इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती हे त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवसच विरसले होते. ही रोचक बाब उघड झालीआहे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये. त्यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्या, लेखिका सुधा मूर्ती यांनी हा किस्सा सांगितला आहे. या दोघांनी नुकतीच कपिल शर्मा याच्या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यांच्या बरोबर झोमॅटोचे संस्थापक दिंपेंदर गोयल व त्यांची पत्नी ग्रेसिया मुनोझ हे ही उपस्थित होते.
भारताच्या आयटी क्षेत्राला जगभरात ओळख मिळवून देणारे म्हणून इन्फोसिस व नारायण मूर्ती यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या प्रतिथयश लेखिका असून नुकत्याच त्या राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. तसेच त्यांची मुलगी अक्षता मूर्ती या ब्रिटनचे माजी पंतप्रधान ॠषी सुन्नक यांच्या पत्नी आहेत. नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांनी द कपिल शर्मा शोमध्ये नूकतीच हजेरी लावली यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
त्यांच्या लग्नाचा २५ व्या वाढदिवस हे नारायण मूर्ती विसरले होते. त्या दिवशी सूधा मूर्ती यांनी दोन त तिन वेळा ‘हिंट’ दिली होती पण त्यांना काहीच आठवले नाही. त्या दिवशी संध्याकाळी ते मुंबईला जाण्यासाठी विमानतळवार गेले होते. सहज त्यांनी मूलगी अक्षता हिला फोन केला. त्यांची मूलगी त्यावेळी स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमध्ये शिकत होती. त्यांनी सांगितले की मुंबईला जाण्यासाठी विमानाची वाट पाहत आहे. तेव्हा मुलीने त्यांना तात्काळ बंगळूर ला परत जाण्यास सांगितले. तुमच्या पत्नीला व माझ्या आईला शुभेच्छा द्या असे ती म्हणाली. तेव्हा मूर्ती यांना आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असल्याचे लक्षात आले.
पूढे सुधा मूर्ती यांनी सांगितले की तो दिवस खास होता. आयुष्यात एकदाच येणार होता म्हणून मी दिवसभर त्यांना आठवण करुन देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या लक्षातच आले नाही. या गोष्टीमुळे अक्षता नाराज झाली होती व अमेरिकेत असे कधीही घडत नाही असे म्हणाली होती. असेही सूधा मूर्ती यांनी सांगितले.
सुधा मूर्ती एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी कबूली दिली की आपल्याला जेवण चांगले बनवता येत नाही. ‘मै इतना खराब खाना बनाती हूँ ना, मूर्ती साब का वेट देखो’ अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.