मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्याचा तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीशी साखरपुडा 

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाला कुस्ती शिकवण्यासाठी आलेली सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे (rucha apte) हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. आतातुम्ही म्हणाल की, तिचा होणारा पती आहे तरी कोण? तर तो आहे मूळशी पॅटर्न या प्रसिध्द चित्रपटातील अभिनेता क्षितिज दाते. (kshitij date)  

विशेष म्हणजे, त्यांच्या साखरपुड्याला १ वर्ष झाले आहे. दोघांनी २०२० मध्ये साखरपुडा केला होता. पण, त्याबद्दलचे वृत्त समोर आले नव्हते. आता फोटो शेअर करताना दोघांनीही A year to this day? #engagementin2020 

दोघांनीही (rucha and kshitij) आपापल्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही सुखद बातमी आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात क्षितिजने गण्याची भूमिका साकारली होती. तर ऋचा आणि क्षितिज दोघांनीही छोट्या पडद्यावर बन मस्का या मालिकेत एकत्रित काम केले होते. 

वाचा- मला ब्रेस्ट वाढवण्याचा सल्ला दिला : प्रियांका चोप्रा

सूत्रांच्या माहितीनुसार,या मालिकेद्वारे त्यांची इथेच जवळीक वाढली. क्षितिज अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सरसेनापती हंबीरराव या आगामी चित्रपटातही तो एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

वाचा- स्विमिंग पूलमध्ये सनी लिओनीच्या कातिलाना अदा (photos) 

ऋचा आपटेने अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती छोट्या पडद्यावरील मालिका अस्सं माहेर नको गं बाई मध्ये काम करत आहे. या मालिकेत ती मुक्ताची भूमिका साकारत आहे. २०२० मध्ये दोघांनी केलेल्या साखरपुड्याची बातमी २०२१ मध्ये दिल्याने चाहते अवाक झाले आहेत. दोघांचे अभिनंदन, शुभेच्छा मिळत आहेत. आता दोघे लग्न कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news