

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा द रुल्स’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा बिहारची राजधानी पटना येथे पार पडला. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. २०२१ साली आलेल्या पुष्पा द राईज या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या गर्दीला आवारण्यासाठी सुरक्षारक्षाकांचीही भंबेरी उडाली होती. चित्रपटाचा नायक अल्लू अर्जून व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी अक्षरक्षः तोबा गर्दी केली होती. येथील गांधी मैदान येथे हा सोहळा आयोजित केला होता.
२०२१ साली आलेल्या पुष्पा या तेलगु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पुष्पा तील नायक अल्लू अर्जूनच्या अभिनयाने अनेकांना वेड लावले. त्या चित्रपटातील गाणी संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. अनेक रसिकांनी त्यावर रिल्स बनवली ती ही प्रचंड गाजली. ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपटाचा पहिला भाग होता. आता ‘पुष्पा र रुल्स’ हा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे.