सोनालीनं लॉकडाऊनमध्ये दुबईत केलं लग्न

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

नटरंग चित्रपटातील 'अप्सरा आली' या प्रसिद्ध लावणी गीतावर अदाकारी पेश करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाला माहिती नाही. तिच्या ठसकेबाज नृत्याने अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घातली. रातोरात चंदेरी दुनियेची खरीखुरी 'अप्सरा' झाली. आता त्या सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. तिने आज कुणालशी लग्न गाठ बांधत आपल्या लग्न सोहळ्याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. 

सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून तिने दुबईत लग्न केल्याचे जाहीर केले आहे. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केले आहे. 

या सोहळ्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पाहुणे उपस्थितीत होते. या आनंदमयी सोहळ्याला मात्र सोनालीचे आई-वडील आणि कुणालचे आई-वडीलही अनुपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नाला हजेरी लावली. 

सोनालीने फेसबुकवर कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, 

अब से हम '7' 'मे'

Kunal 'Keno' Benodekar

So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतो

Uk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली.

लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले,आणि भारतात second wave आली

Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही! 



April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..

Quarantine, travel restrictions, family साठी असणारी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.

June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. 


आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून 'लग्न' जास्त महत्वाचं आहे ना की 'समारंभ'. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही



आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडन ला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आताच शिक्का मोरतब करून टाकू.

२ दिवसात सगळं ठरवलं. 

एका तासात खरेदी आणि १५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात, 

( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून 

( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) 

Marriage Certificate वर sign केलं. 

इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे Rahul Tulpule Deepali Tulpule यांचे आभार

आमचे foster parents Sachin Narhar Joshi Shriya Joshi 

आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या Madhavi Amdekar Kolumbus International Marriage Bureau for professionals चे ही मनापासून आभार

पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, 

तेव्हा, तिथे, तसं, family & friends बरोबर सगळ्या विधीनिशी आमची dream wedding करूच.

तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news