मुंबई : पुढारी ऑनलाईन
काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' फेम 'गोरी मॅम' म्हणजेच सौम्या टंडनने (अनिता भाभी) ही मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून निर्माता गौरी खान (Gauri Khan) या मालिकेसाठी नव्या अनिता भाभीचा शोध सुरू केला होता. तर सध्या हा शोध पुर्ण झाला आहे. या भूमिकेसाठी अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावाची चर्चा होती. पण या मालिकेसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीला संधी मिळाली आहे.
अधिक वाचा : 'अंग लगा दे रे' गाण्यात चुंबन दृश्यावेळी इंटिमेट झाले होते दीपवीर
अभिनेत्री सोम्या टंडन या 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतून माघार घेतल्यावर त्यांच्या जागी कोण काम करणार याचे कोडे निर्माते, दिग्दर्शकांसह प्रेक्षकांना ही पडले होते. अखेर तब्बल चार महिन्याच्या शोध मोहिमेनंतर या मालिकेसाठी बॉलिवूड तथा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसेंची (Nehha Pendse) वर्णी लागली आहे.
सौम्या टंडनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या मालिकेतून बाहेर पडली होती. तेव्हापासून निर्मात्यांनी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते. सौम्या टंडनने जवळपास ५ वर्ष या मालिकेत काम केले होते. या दरम्यान 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेचे दिग्दर्शक संजय कोहली यांनी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला विचारणा केली. परंतु, सुरुवातीला तिने या मालिकेसाठी काम करण्यास नकार दिला होता. यानंतर ४ महिन्यांनी निर्मात्यांनी पुन्हा नेहा पेंडसेशी संपर्क केला तेव्हा तिने या प्रोजेक्टला होकार दिला. यामुळे सौम्या टंडनच्या जागी नेहा पेंडसे या मालिकेत भूमिका साकारणार आहे. नेहा पेंडसे लवकरच शूटिंगला सुरूवात करणार आहे.
अधिक वाचा :खासदार नुसरत जहांनी विविध आऊट-फिट परिधान करत केला व्हिडिओ शेअर
नेहा पेंडसेचा संजय कोहली यांच्यासोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. या आधीही नेहाने 'मे आय कम इन मॅडम' या शो मध्ये लीड रोल केला होता. नेहा पेंडसेच्या आधी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे नाव 'भाभी जी घर पर हैं' मालिकेसाठी घेतले जात होते.