पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी लिव्ह आणखी एका मराठी भन्नाट गुन्हेगारी संबंधीत थ्रिलर वेब सिरीज प्रेक्षकांसमोर घेवून येण्यास सज्ज आहे. 1972 ते 1974 या काळात देशाला हादरवून सोडणाऱ्या सर्वात भयंकर ऐतिहासिक घटनांपैकी एक म्हणजे मनावत मर्डर्स प्रकरण. याप्रकरणांचा उलगडा आशिष बेंडे दिग्दर्शित आगामी मालिकेत होणार आहे. ज्यामध्ये भारताचे शेरलॉक होम्स म्हणूनही ओळखले जायचे असे सीआयडी म्हणून डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथके होती. ही पथके अत्यंत जटिल प्रकरणे सोडवण्यासाठी आवश्यक असलेली अटल वचनबद्धता, दृढता आणि कौशल्य ठळक करताना दिसणार आहेत.
महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे निर्मित आणि गिरीश जोशी लिखित मानवत मर्डर्सचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले आहे. रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रात्मक कार्यावर आधारित, "फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राईम" या शोमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ही घटना आहे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मानवत या गावामध्ये घडलेली. या गावामध्ये झालेल्या अनेक खून प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. १९७२ ते १९७४ या कालावधीत गावातील महिला आणि मुली गायब होण्यास सुरुवात झालेली. यानंतर गावामध्ये एकूण सहा महिलांचे मृतदेह आढळले. या मुलींचे मृतदेह शेतात, विहिरीत अथवा नदीवर सापडले जायचे. या मिळालेल्या मृतदेहासोबत विटंबना केलेली असायची. हे मानवत मर्डर्स प्रकरण मुली तसेच महिलांना मारण्याची मारेकरऱ्याची पद्धत ही एकसारखीच होती. पुढे ठराविक कालावधीमध्ये आणखी मृतदेह आढळून आले. या घटनांमागे नक्की कोण आहे? पोलिसांना याचा सुगाव लागत नव्हता. तसेच एकाने स्वत: दोन महिलांचा खून होताना बघितला. मग हे खून कोण आणि का करत होतं? याचा उलगडा झाला. यासर्व खुनामागे अंधश्रद्धा. करणी, आणि जादूटोणा हा प्रकार उघडकीस आला.
मानवतमध्ये झालेल्या अनेक खून सत्रांचा उलगडा नक्कीच 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल. आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ४ ऑक्टोबरपासून 'मानवत मर्डर्स' सोनी लिव्हवर बघता येईल.