मुंबई : पुढारी ऑनलाईन
'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्याने चाहत्यांच्या अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली आहे. मानसीने आपल्या बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. या विवाहात मानसीचे जवळचे कुटुंबिय, नातेवाईक यांच्यासह बॉलिवूड स्टार्संनीदेखील हजेरी लावली होती. या विवाहातील कार्यक्रमाचे आणि हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अधिक वाचा : मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा बोल्ड लूक, चाहते घायाळ
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा याचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याचे विधी उत्साहात पार पडले. या फोटोंमध्ये नववधूच्या वेषात मानसी नाईक सुंदर दिसत आहे. मानसीने गुलाबी रंगाचा लेहंगा तर प्रदीपने शेरवानी परिधान केली आहे.
काही दिवसांपासून मानसीच्या घरात लगीन गाई सुरू झाली होती. यातील अनेक विधींचे फोटो मानसीने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मानसीचा नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबईत साखरपुडा पार पडला होता. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले होते. मानसीने फक्त सहा लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणात आपला साखरपुडा उरकला होता. साखपुडा झाल्यावर मानसीने आपल्या बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत एक फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली होती. Engaged Future Mrs. Kharera अशी पोस्ट करत तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा बॉक्सर आहे.
(video, photo : peepingmoonmarathi instagram वरून साभार)