नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता गोविंदा आपल्या डान्स शैलीसाठी ओळखले जातात. अभिनयाबरोबर माधुरीने डान्सच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, गोविंदा आणि माधुरी दीक्षितचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात दोघे स्टेजवर 'मखना' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित आणि गोविंदाचे डान्स आणि त्यांच्या हावभावाने एकदम भन्नाट वाटत आहे. हा व्हिडिओ भारतीय बॉलिवूड डान्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिला आहे.
अधिक वाचा : सेक्सवर्धक औषधाच्या ओव्हर डोसने आंतरराष्ट्रीय पैलवानाचा मृत्यू
माधुरी दीक्षित आणि गोविंदाच्या या व्हिडिओमध्ये हे दोघेही स्टेजवर एकदम झकास दिसत आहेत. या डान्समुळे चाहत्यांनी कमेंटचा धुरळाच पाडला आहे. 'मखना' या गाण्यावर माधुरी आणि गोविंदा नाचताना स्टेज गाजवत असल्याचे या व्हिडिओतुन दिसून येते. 'मखना' हे गाणे गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्या 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाचा आहे. यात माधुरी दीक्षित ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्याच जुन्या व्हिडिओवर नाचताना त्यांनी स्टेजवर एकत्र बरीच मस्ती करताना दिसतात.
अधिक वाचा : मल्टिप्लेक्सची करवाढ विरोधामुळे तूर्तास टळली
माधुरी दीक्षितचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. माधुरी बॉलिवूडमध्ये शेवटची कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात तीच्या भुमिकेचे कौतुक झाले होते. याशिवाय माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमीच खुश करत असते. माधुरी अनेकदा आपले व्हिडिओ कुटुंबासमवेत शेअर करते. इतकेच नाही तर चाहत्यांनाही घरी डान्स करण्यासाठी प्रेरित करते.