

पुढारी ऑनलाईन डेस्क: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani- Sidharth Malhotra ) यांच्या लग्नाला ७ फेब्रुवारीरोजी दोन वर्षे पूर्ण झाली. दरम्यान त्यांनी आज (दि.२८) इंस्टाग्रामवर न्यूबॉर्न बेबी सॉक्सचा फोटो शेअर करत गुड न्यूज दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की "आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट, लवकरच येत आहे." त्यांनी आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. या जोडप्याने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. त्याच्या पोस्टवर चाहतेही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याचे अभिनंदन करत आहेत.
कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले- 'आपल्या आयुष्यातील सर्वात गोड भेट लवकरच येत आहे.'