पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड सुंदरी कतरिना कैफ आणि विक्की कौशलने लोकांसमोर कधीही त्यांच्या प्रेमाच्या अँगलची कबुली दिलेली नाही. परंतु, सोशल मीडियावर चुकून पोस्ट केलेल्या त्यांच्या एका फोटोने प्रेमाची संपूर्ण कहाणी सांगितली गेली आहे. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यापासून कतरिना विकी कौशलसोबत होती. आता बातमी येत आहे की कतरिना विकीबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि लवकरच ती सर्वांसमोर आणण्यास उत्सुक आहे. दोघांचे चाहतेही या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना कैफ आता विकी कौशलच्या व्यावसायिक आयुष्यातही प्रवेश करित आहे. कतरिनाने विकीला आगामी चित्रपटात कोणत्याही अभिनेत्रीबरोबर इंटिमेट सीन करण्यास मनाई केली आहे. विकी कौशल सारा अली खानसमवेत 'द इमॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटात दिसणार आहे आणि दोघांचेही काही इंटिमेट सीन आहेत, पण कॅट याच्या विरोधात आहे. तिने सिनेमात सारा अली खान सोबत कॅमेरासमोर फारसे इंटिमेट सीन असू नयेत, असा स्पष्ट संकेत दिला आहे.
मात्र, असेही वृत्त आहे की विकी कौशलचे वडील या नात्यावर खुश नाहीत. त्यांनी आपल्या मुलाला कतरिनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कदाचित हेच कारण आहे की कॅटला हे प्रकरण लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. यापूर्वीही कतरिना रणबीर आणि सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण दोघांचे नातं वाढल नाही.
कतरिना आणि विकी कौशल या जोडप्याने हे नवीन वर्ष एकत्र साजरे केलं होतं. अलिबागमध्ये नवीन वर्षाच्या सोहळ्यात तिच्यासोबत सनी कौशल आणि इसाबेला कैफी देखील होते. तरीही, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने काही बोललेले नाही, पण बातमीनुसार दोघांमध्ये सर्व काही ठीक होत नाही. चर्चा अशी आहे की कतरिना कैफ विक्की कौशलसोबत नात्याचा उलघडा करण्यासाठी आतुरतेने वाट पहात आहे