मुंबई : पुढारी ऑनलाईन
'सारेगमप- लिट्ल चॅम्प्स'ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांचा विवाह पार पडला आहे. कार्तिकीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला होता.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कार्तिकी म्हणाली होती, हे सगळ अचानक ठरलं. आमचे अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे.
निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्तिकी-रोनितचे लग्न पार पडले.
घागर घेऊन, नवरी नटली यांसारखी हिट गाणी तिने गायली आहेत.
रोनितला संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. तबल्याच्या तीन परीक्षाही त्याने दिल्या आहेत.
रोनित मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो स्वतः व्यावसायिक आहे.
रोनित पिसे पुण्याचा राहणारा आहे.
फोटो-kartiki_kalyanji_gaikwad_f वरून साभार