

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक आर्यन याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्याचा 'भूलभुलैया-३' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिका साकारणारा कार्तिक हा गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चेत आहे.
त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक रोमॅटिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यामध्ये कार्तिकने बोल्ड सीन्सही दिले आहेत. परंतु, एका चित्रपटामध्ये कार्तिकची किसींग सीनमुळे डोकेदुखी खूपच वाढली होती. केवळ एका किसींग सीनसाठी त्याला ३७ रिटेक द्यावे लागले होते. याचा खुलासा कार्तिकने एका मुलाखतीत केला आहे. तो म्हणाला की, 'कांची द अनब्रेकेबल' या चित्रपटात मी व अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होतो सुभाष घई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
'कांची: द अनब्रेकेबल' या चित्रपटातील एक रोमॅटिक सीन करताना मला खूपच तणाव आला. मी कधी विचारच केला नव्हता की, हा किसिंग सीन माझ्यासाठी डोकेदुखी ठरेल. त्यादिवशी आमच्या वागण्यातही खूप बदल झालेला मला बघायला मिळाला. एका सीनसाठी सुभाष घई यांनी आमच्याकडून ३७ रिटेक करून घेतले.