Kapil Sharma Season 2 : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन २ची घोषणा; कपिलची न्यू थीम

'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन २ची घोषणा; कपिल शर्माची न्यू थीम
Kapil Sharma Season 2
Kapil Sharma Season 2 : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन २ ची घोषणा; कपिल शर्माची न्यू थीम Kapil Sharma Season 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्सने काही महिन्यांपूर्वी 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ( Kapil Sharma Season 2 ) चा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याचे संकेत दिले होते. आता अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माने नव्या सीझनची घोषणा केली आहे. यासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनची थीमची झलकही पाहायला मिळाली आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, आता पुन्हा एकदा हस्याचा कल्लोळ पाहायला मिळणार आहे.

कॉमेडियन कपिल शर्माने नुकतेच काल १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्राम स्टोरीवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत फुलांचा गुच्छ आणि त्यावरल फोटो प्रेममध्ये शोमधील कलाकारांचा फोटो दिसत आहे. या फोटो प्रेममध्ये दोन वेगवेगळ्या कलाकारांचे फोटो दिसत आहेत. यावरून हे फोटो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या सीझन आणि दुसऱ्या सीझनचे असल्याची माहिती मिळतेय. यावरून दुसऱ्या सीझनच्या थीमची झलक चाहत्यांना यात पाहायला मिळत आहे.

पहिल्या फोटोत संपूर्ण कलाकारांनी एयरपोर्ट थीमचे पोशाख परिधान केले आहेत. ही थीम अमन पंत यांनी तयार केली होती. तर दुसरी थीमचा फोटोही दिसत आहे. मात्र, दुसरी थीम कोणत्या प्रकारची असणार?, कलाकार कोणकोणते असणार? यांची अध्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान यात बॉलिवूड अभिनेत्री गौरी खान, नीलम कोठारी, महिप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे हे पाहूणे कलाकार येणार असल्याचे बोलले जात आहे.

admin

इन्टास्टोरीवरच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन लवकरच येत आहे. दुसऱ्या सीझनच्या थीमची पहिली झलक.' यावरून आगामी सीझनमध्ये काही तरी खास असणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पहिला सीझन ३० मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होवून २२ जूनपर्यंत चालला होता.

Kapil Sharma Season 2
The Great Indian Kapil Show : भारती सिंह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये नसणार! कारण आले समोर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news