कंगना राणावतला मिळाला एकता कपूरचा नवा शो

कंगना राणावतला मिळाला एकता कपूरचा नवा शो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन ; छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १५' शो संपताच बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूरने (Ekta Kapoor) ओटीटीवर खतरनाक रिअ‍ॅलिटी शो 'लॉक अप' ची घोषणा केली आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत करणार आहे. या शोची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कंगना राणावत आगामी रिॲलिटी शो 'लॉक अप' होस्ट करण्यासाठी सज्ज झाली आहे. यातील खास म्हणजे, कंगना आणि एकता पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. या शोत १६ सेलिब्रिटीचा समावेश असून त्याना खतरणात टास्क दिले जाणार आहेत. एकताने गुरुवारी इंस्टाग्रामवर 'लॉक अप' शोची एक झलक शेअर केली आहे. हा शोचे प्रीमियर २७ फेब्रवारीला होणार आहे.

यामध्ये कंगना एका शानदार खुर्चीवर बसून व्यासपीठावर आलेली दिसते. तर यावेळी तिने घातलेल्या ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यावेळी कंगना सिल्व्हर रंगाच्या हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली. तसेच तिची हेअरस्टाईल नेहमी पैक्षा वेगळी दिसत होती. कंगनाचा हा लुक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

याविषयी बोलताना कंगना म्हणाली की, "लॉक अप' या खतरनाक शोचे सुत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी अत्यंत उत्साही आहे. या शोसाठी ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर या दोघेजण प्रचंड मेहनत घेत आहेत. मला खात्री आहे की, हा शो तुम्हाला खूपच आवडेल.'

याशिवाय 'लॉक अप' या शोचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर जाले आहे. या पोस्टरमध्ये एकता कपूरने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि खतरनाक रिअॅलिटी शो -लवकरच घेवून येत आहे. असे लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकताने याविषयी कंगना राणावतशी चर्चा केली असून ती यासाठी सज्ज झाली आहे. या शोचे होस्ट करण्यासाठी निर्मात्यांनी याआधी अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्याशी चर्चा केली असल्याचे समजते. याशिवाय कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून आपले हॉट फोटोज शेअर करत असते. नुकतेच तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूल घातला आहे.

हेही वाचलंत का?

( video : lockuppgame instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by LockuppGame (@lockuppgame)

 

View this post on Instagram

 

A post shared by LockuppGame (@lockuppgame)

 

View this post on Instagram

 

A post shared by LockuppGame (@lockuppgame)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news