अलीकडील काळात देशभक्तीवरून जगातील सर्व विषयांवर बोलणाऱ्या कंगना रागणावतचा बिकीनीमधील फोटो व्हायरल झाला आहे. तिने मेक्सिकोच्या बीचवरील (kangana has received a few critical comments for sharing an old picture from the beaches of Mexico) बिकीनीमधील फोटो शेअर केला होता. मात्र, त्या बिकीनीतील फोटोमुळे तिला सोशल मीडियावर शिव्यांचा भडिमार झाला. त्यामुळे नेहमीप्रमाणे खवळलेल्या कंगनाने ट्रोल करत असलेल्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.
कंगनाने तिला सनातन धर्म शिकविणाऱ्यांना उत्तर देताना म्हटले आहे की, काही लोक माझे बिकिनी फोटो पाहून मला धर्म आणि सनातनवरून व्याख्यान देत आहेत. एखादी आई भैरवी केस, कपडे, रक्त प्यायची प्रतिमा घेऊन बाहेर आली तर तुझे काय होईल? तुमची फाटून जाईल आणि स्वत: ला भक्त म्हणून घेता? धर्माने वाटचाल करा, त्याचा ठेकेदार होऊ नका….जय श्री राम. बुधवारी कंगनाने मेक्सिकोतील समुद्रकिनाऱ्यावरील स्वतःचा बिकिनी परिधान केलेला एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर या फोटोवरून तिच्यावर शिव्यांचा वर्षाव झाला आहे.
या लोकांना प्रत्युत्तर देताना कंगनाने ट्विटरवर (Kangana ranaut trolls on social media) स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला. याशिवाय तिने कॅप्शनही दिले. कंगनाने मेक्सिकोमधील आपला जुना फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गुड मॉर्निंग मित्रानो, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या उत्तम जागांपैकी एक म्हणजे मेक्सिको. हे एक अतिशय सुंदर आणि अनपेक्षित ठिकाण आहे. मेक्सिकोच्या तुलम आयलँडचा माझा एक फोटो. राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलणारी कंगना रानावत सध्या शेतकरी आंदोलनावरही बोलत आहे.
यापूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनावर अनेक वेळा ट्विट केले होते आणि ते म्हणाली होती की काही लोक त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय ट्विटमध्ये पंजाबमधील वृद्ध महिलेला शाहीन बागची आजी म्हणत ट्विट केले होते. नंतर तिने ते ट्विट डिलीट केले, पण तोपर्यंत बरेच वादंग निर्माण झाले होते. या ट्विटसंदर्भात कंगनाला दोन कायदेशीर नोटिसा मिळाल्या आहेत.