'Kalki 2898 AD’ चित्रपटामुळे हिंदूच्या भावना दुखावल्याने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निर्मात्यांना बजावली कायदेशीर नोटीस
Kalki 2898 AD
कल्की चित्रपट वादाच्या भोवऱ्यातPudhari File Photo
Published on
Updated on

प्रभास, अमिताभ बच्चन, दिपिका स्टारर 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस उलटल्यानंतरही वादात सापडला आहे. काँग्रेसचे माजी नेते आणि श्री कल्की धामचे प्रमुख आचार्य प्रमोद कृष्णम यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक तथ्ये आणि धार्मिक पुस्तकांशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. भारतीय धर्मग्रंथांमध्ये नोंदवलेल्या भगवान श्री कल्कीच्या अवताराचा संदर्भ देत आचार्य यांनी चित्रपटात दाखविलेल्या दृश्यांचे काल्पनिक वर्णन केले आहे. त्यांनी निर्मात्यांना चुकीचे चित्रण थांबवण्याचे आवाहनही केले आहे.(Kalki 2898 AD)

Kalki 2898 AD | नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी

  • 'कल्की' या चित्रपटाने भगवान कल्कीबद्दल हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये लिहिलेली आणि सांगितलेली मूळ संकल्पना बदलली आहे.

  • कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे, तर त्याचे आगमन चित्रपटात सांगितले आहे. या कारणांमुळे भगवान कल्कीच्या कथेचे चित्रण पूर्णपणे चुकीचे आहे.

  • श्रीमद भागवत महापुराणातील १२ व्या स्कंधातील २४व्या श्लोकात भगवान श्री कल्की यांचे जन्मस्थान आणि त्यांचा जन्म कुठे होणार आहे, याचा उल्लेख आहे. तर चित्रपटात कल्कीला एआय तंत्रज्ञानाद्वारे अवतार दाखवण्यात आले आहे.

  • कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक श्रद्धा आणि प्रथा यांचे केंद्रस्थान असलेल्या पवित्र ग्रंथांचाही हा घोर अपमान आहे.

  • अशा पात्रांनी हिंदूंमध्ये आधीच संभ्रम निर्माण केला आहे आणि भगवान कल्कीच्या पौराणिक कथांना हानी पोहोचवू शकते.

Kalki 2898 AD |चित्रपट पाहिल्यानंतर मला वाईट वाटले: आचार्य कृष्णम

याबाबत एएनआयशी बोलताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, सनातन धर्माच्या संस्कृतीशी खेळण्याची कोणालाही परवानगी नाही. संभलच्या कल्की धामची पायाभरणी झाली. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गर्भगृहाची पायाभरणी केली आहे. चित्रपटात भगवान श्री कल्कीचा अवतार ज्या पद्धतीने दाखवला जात आहे, त्यामुळे मन दुखावले आहे. पुराणातील संदेशाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंदू ग्रंथांशी खेळणे हा निर्मात्यांचा छंद

आचार्य पुढे म्हणाले, 'चित्रपट आपल्या ग्रंथांपेक्षा पूर्णपणे वेगळी कथा सांगतो. हिंदूंच्या भावनांशी खेळणे ही चित्रपट निर्मात्यांची सवय झाली आहे. संतांना असुर म्हणून चित्रित केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या विश्वासाशी खेळू शकता. (Kalki 2898 AD)

निर्मात्यांनी १५ दिवसांत उत्तर द्यावे

सुप्रीम कोर्टाचे वकील उज्ज्वल नारायण शर्मा म्हणाले की, निर्मात्यांना या नोटीसला १५ दिवसांत उत्तर द्यावे लागेल. जनभावना दुखावणाऱ्या या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाला माफी मागावी लागेल. तसे न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला जाईल. पुढे बोलताना ते म्हणाले, चित्रपट निर्माता एंटरटेनमेंट अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक, दोन मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन, दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट कलाकार आणि इतर काही कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

चित्रपटाची भारतात 600 कोटींची कमाई

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याने भारतात 600 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपटाने हिंदी भाषेत 300 कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या जवळ आहे. तसेच या चित्रपटाची घौडदौड बॉक्स ऑफिसवर अजून सुरुच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news