Devara: Part 1 : ज्युनियर एनटीआर- जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणे थायलंडमध्ये

Devara: Part 1
Devara: Part 1

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी 'देवरा पार्ट १' हा चित्रपट येत आहे. जान्हवी 'देवरा पार्ट 1' या चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा पदार्पण करणार आहेत. या ॲक्शन ड्रामा चित्रपटासाठी ज्युनियर आणि जान्हवीचे एक रोमँटिक गाणे शूट केले जाणार आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगला पोहोचली आहे.

एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अभिनेता ज्युनियर एनटीआर नुकतेच गोव्यातील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून घरी परतला आहे. एनटीआरने गोव्यात एक ॲक्शन सीन शूट केलाय. एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानही दिसला होता. तर चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर रथनावेलू यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये गोव्याचे वेळापत्रक पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. याच दरम्यान चित्रपटाचे एक रोमँटिक गाणे थायलंडमध्ये शूटिंग होणार असल्याची माहिती दिली आहे. या गाणे ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरवर शूट केलं जाणार असून दोघेजण यात रोमँटिक मूडमध्ये दिसणार आहेत.

'देवरा पार्ट १' चे दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केलं आहे. हा चित्रपट याआधी १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठी अभिनेत्री श्रुती मराठे या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यामुळे चाहते ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीचे रोमँटिक गाणे आणि चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Devara Movie (@devaramovie)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news