image of Jarann poster
Amruta Subhash-Anita Dare Jarann released Instagram

Jarann Marathi Movie Review: थरारक वळण आणि सुटत जाणारे गुंते... अमृता सुभाष- अनिता दातेचा जारण चित्रपट पहावा का?

Jarann Review | जागर : कल्पनाविश्व आणि वास्तव यांचा रंजक खेळ
Published on
पुढारी चित्रपट परीक्षण (4 / 5)
अनुपमा गुंडे
Summary

या चित्रपटात गंगुटी सारखं काळी जादू करणाऱ्या पात्राचा हेतू, तिची मानसिकता यावरही चित्रपटाने प्रकाश टाकला असता, तर हा चित्रपट अधिक भिडला असता. राधा घराबाहेर आल्यावर दोन तीन वेळा काळं मांजर बंगल्यातून बाहेर जाणं... गंगुटीच्या भागाबाई या बाहुलीनं मांडलेला उच्छाद, गंगुटीची काळी जादू करणारी दृश्य, तिची भाषा या जागा लक्षात रहातात.

Amruta Subhash-Anita Dare Jarann released

अंधश्रध्दा या अफवा असतात, आणि या अफवा खऱ्या ठराव्यात म्हणून आपण आटापिटा करत असतो, याची प्रचिती समस्त महाराष्ट्राला गणपती जेव्हा दुध पितो या अंधश्रध्दारूपी अफवेने आली होती. खरंतर समाज कुठल्या ना कुठल्या अंधश्रध्दा आणि श्रध्दा यांच्या खेळात अडकलेला आहे. माणसाच्या मनातील सुडाची भावना, ईर्षा, असुया पूर्ण करण्यासाठी आजही काहीजण अंधश्रध्दांचा आसरा घेतात. पण या अंधश्रध्दांच्या भ्रमात जगणाऱ्यांमुळे त्यांच्या सहवासात राहणाऱ्या डोळस माणसांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. राधा (अमृता सुभाष) आपल्या मुलीसह गावी निघाली आहे. ती गाडी चालवतांना गाडीत असलेल्या मुलीशी आणि फोनवर नवऱ्याशी संवाद साधते आहे.

सादरकर्ते: अनीज बाजमी

निर्माते : अमोल भगत, नितीन भालचंद्र कुलकर्णी

सहनिर्माते : मनान दाणिया

बॅनर : ए-३ ईव्हेंट्स अॅन्ड मिडियी सर्व्हिसेस प्रॉडक्शन, ए अॅन्ड एन सिनेमाज एलएलपी

लेखक व दिग्दर्शक - हर्षिकेश गुप्ते

भूमिका राधा अमृता सुभाष, गंगुटी--अनिता दाते, डॉ. धनंजय कुलकर्णी किशोर कदम, डॉ. रश्मी पंडित - ज्योती मालशे बाबा राजन भिसे, आई सीमा देशमुख -शेखर - विक्रम गायकवाड, अवनी जोशी सई दुर्वा देवधर - लहानपणीची राधा, रेवती - अमृता

तिचे वडील (राजन भिसे) गावातील वाडा विकणार असतात, त्यामुळे त्यांचे सगळे नातेवाईक या वाड्यात अखरेचे एकत्र येणार असतात. गावी गेल्यावर राधाची आई (सीमा देखमुख) तिचे इतर नातेवाईक, चुलत बहिणी यांच्यातील संभाषणानुसार राधाच्या जीवनात भुतकाळात म्हणजे बालपणात काही तरी घडून गेले आहे, याची कल्पना येते, पण त्याचे पडसाद वर्तमानही तिच्या आयुष्यात उमटत असतात, त्यामुळे ती मानसोपचार तज्ञ डॉ. धनंजय कुलकर्णी (किशोर कदम) यांच्याकडे उपचार घेत असते. त्यांच्या वाड्यात रा-हणारी भाडेकरू गंगुटी (अनिता दाते) ही करणी, काळी जादू करणारी बाई असल्याने तिला वाड्यातून हकलून द्या म्हणून गावकरी राधाच्या आईला सांगतात, त्यावरून तिची हकालपट्टी केली जाते, मात्र याचा सूड म्हणून गंगुटी घरात काही सामान राहिले आहे, ते परत घ्यायला म्हणून येते, आणि राधावर जारण करते आणि तिथून राधाचं बालपण हरवते, पण तेव्हापासून ती आपल्या कल्पनाविश्वाचं स्वतःचं एक जग निर्माण करत असते आणि त्या जगातच ती रममाण असते, आणि बाहेरच्या जगानंही हे कल्पनाविश्व स्वीकारावे म्हणून ती प्रयत्न करत असते.

image of Jarann poster
Vikrant Massey-Shanaya Kapoor | ब्लाईंड लव्ह स्टोरी; विक्रांत मेस्सी-शनाया कपूरच्या आंखों की गुस्ताखियांचा टीजर

राधानं स्वतः उभारलेले कल्पनाविश्व जगणारी, गंगुटीच्या काळ्या जादूनं परिणाम झालेली, भेदरलेली आणि वास्तवाच्या जगाचा सामना करू न शकणारी राधा अमृता सुभाष यांनी अंत्यत परिणामकारकरीत्या उभी केली आहे..

राधानं उभ्या केलेल्या या कल्पनाविश्वात प्रेक्षकही रमून जातात, मग राधाची मुलगी, तिचा नवरा शेखर (विक्रम गायकवाड) यांचं राधाच्या कल्पनाविश्वातलं वास्तव्य हा सगळा गुंता काय आहे, हे प्रेक्षकांनी पडद्यावर पहिल्यावरच प्रत्येकाला त्या कल्पनारम्य खेळाचा अंदाज घेता येवू शकतो, तितकी परिणामकारकता चित्रपटातील काही दृश्यांत आहे. राधाच्या कल्पनाविश्वाचे पितळ तिच्या वडिलांनीच उघडं केल्यानंतरही ते न स्वीकारता राधा आपला डॉक्टर बदलते. ती डॉ. रश्मी पंडित या समुपदेशकांकडे जाते. तिथून चित्रपट एका भयावह, थरारक वळणावर येतो आणि काही गुंते सुटत जातात.

मोडक, उपाध्ये गुरूजी धनंजय सरदेशपांडे, प्रियंकाची आई रमा नाडगौडा, कामवाली बाई - स्नेहल शिदम, रेवती काकू - वैशाली राजेघाटगे, प्रियंका प्रियंका दातार, काका श्रीकांत --प्रभुदेसाई, भाई वेदांत प्रभुदेसाई, रसिका -रसिका जोशी, डीओपी - मिलिंद जोग

image of Jarann poster
Prathamesh Parab Pauder Film | हिंदी चित्रपटात झळकणार मराठमोळा प्रथमेश परब; नवीन कथा 'पोडर'मधून!

संकलक : अभिजीत देशपांडे

संगीत : एव्ही प्रफुल्ल चंद्रा

गायक : अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनिषा पंद्रकर्णी, लक्ष्मी मेघना

गीतकार : वैभव देशमुख, व्हिडीओ संकलक राहुल ठोंबरे, कोरिओग्राफर - धीरज भालेराव -

स्टार : ★★★★

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news