पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योजक मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची पत्नी राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा गेल्या चार दिवस मोठ्या उत्साहात पार पडत आहे. हा सोहळ्या इटलीतील एका आलिशान क्रुझवर साजरा होत आहे. या पार्टाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मोठ्या दिमाखात हजेरी लावली. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा (Shikhar Pahariya) एक क्युट व्हिडिओ समोर आला आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लव्हबर्ड्स नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळ्यात दिमाखात स्पॉट झाले. यावेळी खास करून जान्हवी तिच्या मित्रासोबत बोलताना आणि प्लेट हातात घेवून जेवताना दिसतेय. यावेळी शेजारी उभा असलेला तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हळूच पुढे येतो. यावेळी जान्हवी त्याला आपल्या ताटातील चमच्याने घास भरवताना दिसतेय. याचदरम्यान शिखरही काही जणांनी गप्पा मारताना दिसतोय. याशिवाय या व्हिडिओत अनेक स्टार्स आणि अंबानी कुटूंबिय दिसत आहेत. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी लव्हबर्ड्सवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. दरम्यान एका युजर्सने लिहिले आहे की, 'चोरी चोरी चुपके चुपके', दुसऱ्या एकाने 'क्युट जोडी' असे म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी जान्हवी ट्रोलही केलं आहे. या व्हिडिओला पाच तासांत ३८ हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
याआधी जान्हवीने शिक्कू नावाचे लॉकेट गळ्यात घातल्याने दोघेजण एकमेंकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. या घटनेनंतर आता त्याचं नातं कन्फर्म होत आहे. शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तर स्मृती शिंदे ही त्याची आई आहे.
हेही वाचा