Esha Deol |...त्यावेळी ईशाला खूपच धक्का बसला

...त्यावेळी ईशाला खूपच धक्का बसला
Esha Deol
ईशाला बालपणी तिच्या वडिलांच्या पहिल्या लग्नाविषयी माहिती नव्हतेinstagram
Published on
Updated on

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांनी दोन लग्न केली आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी दुसरे लग्न ड्रीम गर्ल हेमामालिनी यांच्याशी केले आहे. दोघांची पहिली भेट १९७० मध्ये 'तुम हसी मैं जवां' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याचवेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमामालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या धर्मेंद्र यांनी विवाहित असतानाही १९८० मध्ये दुसरे लग्न केले. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबतही राहतात; तर वेगळ्या राहतात. धर्मेंद्र आणि हेमा यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. या दोघींना बालपणी त्यांच्या वडिलांच्या पहिल्या लग्नाविषयी माहीत नव्हते. याबाबत ईशाला केवळ चार वर्षांची असताना समजले होते.

ईशा म्हणाली की, मी चौथीच्या वर्गात शिकत असताना माझ्या वर्गातील एका मुलाने मला विचारले की, तुला दोन आई आहेत ना? हे ऐकून मला खूपच मोठा धक्का बसला होता. मी तत्काळ त्या मुलाला म्हणाले की, काय मूर्खासारखं बोलत आहेस. मला एकच आई आहे. त्यादिवशी शाळेतून घरी आले आणि मी माझ्या आईला त्याबाबत विचारले होते. मला वाटते की, त्यावेळी आईने मला सर्व खरे सांगितले. त्यावेळी मला आईने सांगितले होते की, बाबांचे आणखी एक कुटुंब आहे. त्यावेळी मला समजले, की माझ्या आईने एका अशा व्यक्तीशी लग्र केलं आहे, ज्याचे अगोदरच एक लग्न झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news