ईशा कोप्पीकर हिला खऱ्याअर्थान 'क्रिष्णा कॉटेज' या सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. तिने अनेक बॉलीवूडपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, काही वर्षांनंतर ईशा कलाजगतातून गायब झाली. काही दिवसांपूर्वी ईशाने पती टिम्मी नारंगसोबत घटस्फोट घेतला आहे. सध्या ती सिंगलच लेकीचा सांभाळ करत आहे. नुकतेच एका मुलाखतीत ईशाने कास्टिंग काऊचची आठवण सांगितली. ईशा म्हणाली, हो, १८ वर्षांची असताना मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. एकदा सेक्रेटरी आणि एकदा एका अभिनेत्याकडूनही मला हा अनुभव आला आहे. तुला त्या अभिनेत्याच्या जवळ जावेच लागेल. त्याने एकटी भेटण्यास ये. ड्रायव्हरलाही सोबत घेऊन येऊ नको. आधीच माझ्याबद्दल काही वाद सुरू आहेत. हे स्टाफचे लोकच माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, असे सांगितले. मग, मी त्याला सांगितलं की सॉरी, मी एकटी येऊ शकत नाही.
तो बॉलीवूडचा एक बडा अभिनेता होता. त्यावेळी मी २२ वर्षांची असेन. कधी काहीजण हात पकडून सांगायचे की, तुला हीरोसोबत जवळीकता साधावीच लागेल. एखाद्याने हे केवळ सांगावे आणि एखाद्याने हात धरून सांगावे, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ईशाने २००९ मध्ये टिम्मी नारंगसोबत लग्नगाठ बांधली होती.