

मुंबई : रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांना सांगितले होते की, समय सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे आणि तो १७ मार्च रोजी मुंबईत परतणार आहे. मुंबई पोलिसांनी रैनाच्या टीमला स्पष्टपणे सांगितले आहे की, पोलिस तपास इतके दिवस वाट पाहू शकत नाही, त्यामुळे चौकशी सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहावे लागेल.
खार पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात शोमध्ये जज असलेले आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा तसेच शो ज्या स्टुडिओमध्ये झाला, त्या स्टुडिओचे मालक बलराज घई आणि शोशी संबंधित तीन टेक्निकल लोकांचा समावेश आहे. रणवीर अल्लाहबादियाच्या टीमने पोलिसांना सांगितले आहे की, तो आजच त्याचे जबाब नोंदवण्यासाठी येऊ शकतो.