मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज उत्कर्ष आणि मीरा चर्चा करताना दिसणार आहेत. मीराला घरच्या सदस्यांनी नाराज असून त्याच्याविरुध्द तिची तक्रार आहे. ही तक्रार (मला फक्त हीच तक्रार आहे) आज उत्कर्षला सांगताना आणि तिचा मुद्दा मांडताना मीरा दिसणार आहे.
मीरा उत्कर्षला सांगणार आहे की, "जेव्हा टास्क होतो आणि उमेदवारी माझ्यावर आली की इथून जय तू ये, आणि इथून विशाल येईल. बाकीच्या मुलीसुद्धा आहेत. याच्यावर मला सोनाली आणि मीनलबरोबर पण बोलायचं होतं पण मी नाही बोलू शकले आजपर्यंत.
जेव्हा सोनाली सुध्दा बोलायची ती स्वत:चं नावं कधी बोलत नव्हती किंवा मीनलचं सुध्दा आजपर्यंत उमेदवारीसाठी किंवा कशासाठी सुध्दा नावं पुढं केलं नाही. नेहेमी तिला विशाल, विकास, जय उत्कर्ष हेच दिसायचे.
का तू पण मुलगी आहेस ना तू तुझं नावं दे, मीनलचे नावं दे किंवा दुसर्याचे नावं दे. माझा हा प्रॉब्लेम होता. आणि मी म्हणून म्हंटल की सगळयांशी होता माझा प्रॉब्लेम. मी इथे फक्त मुलं असं नाही लिहिलं. इथे सगळे जण मिळून खेळायला आले आहोत आणि पुढे मुलांमध्ये हे जाणार मुलीममध्ये या गोष्टी करत होते ते मला पटतं नव्हतं.
मुली असून सुध्दा तुम्ही स्वत:ला पुढे न घेता दुसर्या मुलांना घेता आहेत पुढे. माझी ही तक्रार (मला फक्त हीच तक्रार आहे) होती. आता यावर उत्कर्ष किंवा जय काय म्हणणार त्यांनी कोणते मुद्दे मांडले हे आजच्या भागात कळेलच.
यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामुळे बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
हेही वाचलंत का?