

राम गोपाल वर्मा यांच्या 'भूत' या हॉरर चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. उर्मिला मातोंडकर आणि अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. राम गोपाल वर्मा एका मुलाखतीत म्हणाले की, 'भूत' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची आईही घाबरली होती आणि ती तिच्या घराचे दरवाजे कायम बंद करत असे. आपल्याच मुलाने हा चित्रपट बनवल्याचे माहीत असूनही आई खूप घाबरली होती, यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या चित्रपटाबाबतची प्रतिक्रियाही उघड केली.
अमिताभ बच्चन यांनी जेव्हा चित्रपटाचा प्रिव्ह्यू पाहिला, तेव्हा त्यांची रिक्शन भन्नाट होती. 'मला तुला मारावेसे वाटत आहे,' असे बिग बींनी वर्मा यांच्याकडे कबूल केले. मी असा चित्रपट का बनवला, असेही त्यांनी मला विचारले. हा चित्रपट बघायला मी (अमिताभ बच्चन) का आलो? असा विचार करून मी स्वत:चाच तिरस्कार करत होतो, अशी प्रतिक्रियाही अमिताभ यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासमोर व्यक्त केली होती.