

हुमा कुरेशी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती तिचा कथित प्रियकर रचित सिंगसोबत ‘थम्मा’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजर राहिली. या दोघांचा एकत्रित रेड कार्पेटवरचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सप्टेंबर महिन्यात काही मीडिया रिपोर्टस्मध्ये असा दावा करण्यात आला होता की, हुमा आणि रचित यांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. या वृत्तांना ना दुजोरा मिळाला ना खंडन झाले; मात्र आता ‘थम्मा’च्या स्क्रीनिंगदरम्यान या दोघांनी हातात हात घालून कॅमेर्यासमोर उभं राहत, अफवांना पुन्हा एकदा बळ दिलं आहे. हुमा आणि रचित यांना रेड कार्पेटवर एकत्र पाहून चाहत्यांनी त्यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा केली. दोघेही एकमेकांच्या सोबतीत खूप आत्मविश्वासाने आणि हसत-हसत कॅमेर्यासाठी पोझ देताना दिसले. हुमा आणि रचितचे जवळीक दाखवणारा आणखी एक किस्सा म्हणजे रचितचा वाढदिवस. या दिवशी रचितने एक फोटो पोस्ट करत लिहिलं होतं, ‘दोन काट्यांमध्ये एक गुलाब... वाढदिवसाच्या प्रेमासाठी आणि सेलिब्रेशनसाठी आभार.’ या फोटोत हुमा त्याच्या शेजारी उभी होती. हुमा कुरेशी यापूर्वी दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही तीन वर्षे एकत्र होते, मात्र 2022 नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.