Hans Zimmer | Interstellar चे संगीतकार हान्स झिमर यांचे संगीत शिक्षण झाले आहे केवळ दोन आठवडे : प्रथमचं देणार बॉलिवूडमध्ये संगीत

इंटरस्टेलर्स, पायरेटस् ऑफॅ कॅरेबियन सारख्या जगप्रसिद्ध चित्रपटांचे संगीतकार म्हणून मिळवली आहे ख्याती
Hans Zimmer | Interstellar
Hans Zimmer
Published on
Updated on

इंटरस्टेलर या ख्रिस्तोपर नोलनच्या चित्रपट माईलस्टोन आहे. या चित्रपटाचे म्युझिक आपल्याला अशा खोलात घेऊन जाते की आपणच अंतराळात प्रवेश केला आहे. चित्रपटात दाखवलेल्या अतिभव्य दृश्य थेट मनावर बिंबवण्यात या चित्रपटाचे संगीत कारणीभूत आहे. ते दिले होते जगप्रसिद्ध ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर (Hans Zimmer) यांनी. ते आता बॉलिवूडमध्ये तयार होत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटासाठी संगीत देणार आहेत.

नितेश तिवारी दिग्ददर्शित ‘रामायाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय पुराणातील महापुरुष असलेला व प्रत्‍येक भारतीयाच्या मनात बसलेल्या राम याची जीवनकथा म्हणजे रामायण. त्‍यामुळे प्रेक्षकांची उत्‍सूकता ताणली आहे. या भव्य दिव्य चित्रपटासाठी तिवारी यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. भारतीय चित्रपट संगीतातील सर्वोतृष्ठ संगितकार ए. आर. रेहमान आणि जगप्रसिद्ध जर्मन संगितकार हान्स झिमर हे दोन दिग्गज या चित्रपटाला संगीत देणार आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही मुझिकसाठीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

Hans Zimmer | Interstellar
Ramayana | ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची पत्नी ’उर्मिला’च्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

कोण आहेत जर्मन संगितकर हंस झिमर (Hans Zimmer)

'द लायन किंग' आणि 'इंटरस्टेलर' सारख्या अजरामर चित्रपटांना संगीत देणारे ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. हान्स झिमर हे आधुनिक युगातील सर्वात प्रभावी आणि कल्पक संगीतकारांपैकी एक मानले जातात. त्यांनी आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिले आहे. यामध्ये The Lion King, Gladiator, The Dark Knight Trilogy, Inception, Interstellar, Pirates of the Caribbean, Dunkirk आणि अलीकडील Dune यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

झिमर यांचे संगीत शिक्षण केवळ 2 आठवड्यांचे

1957 फ्रँकफ्रूट जर्मनी येथे जन्मलेले हान्स झिमर हे आजच्या काळातील सर्वात प्रतिभावान संगीतकार ठरले आहेत. जगातील सर्वोतृष्ठ संगितकारांमध्ये त्‍यांची गणना केली जाते. पण ज्यावेळी झिमर 6 वर्षांचे होते त्‍यावेळी त्‍यांच्या पियानो शिक्षकांने त्‍यांच्या आईला धमकी दिली होती की या क्लासमध्ये एकतर हा मुलगा राहिल किंवा मी तरी. 2013 मध्ये स्वतः झिमर यांनी सांगितले होते की माझे म्युझीकचे ट्रेनिंग फक्त दोन आठवड्याचे पियानो वादन एवढेच आहे.

अनेक आर्ट स्कूलंनी काढून टाकले

त्‍यांनी त्‍यावेळी सांगितले होते की त्‍यांना अनेक आर्ट स्कूलंनी त्‍यांना काढून टाकले होते तसेच प्रवेश द्यायला नकार दिला होता. त्‍यांनरत त्‍यांनी एका बॅन्ड मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. यासाठी अनेक वाद्य ते स्वताहून शिकले. व बॅन्डच्या माध्यमातून हळू हळू संगीत शिकत गेले. व जगप्रसिद्ध अने धून तयार केल्या

भावनांची खोली असलेले संगीत

झिमर हे 'इलेक्ट्रॉनिक म्युझिक' आणि 'ऑर्केस्ट्रल अरेंजमेंट' यांच्या अनोख्या मिश्रणासाठी ओळखले जातात. त्यांच्या संगीतात एक प्रकारची भव्यता आणि भावनात्मक खोली असते, जी प्रेक्षकांना कथेशी बांधून ठेवते. आजही अनेकांना पायरेटस ऑफ कॅरेबियन चे थीम म्युझिक व इन्टस्टेलर ची थीम कानात आहे तशी वाजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news