

कला आणि मनोरंजनाच्या दुनियेतल्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘गोल्डन ग्लोब 2026’ चा भव्य पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्टन हॉटेलमध्ये 12 जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमात विविध श्रेणीतले चित्रपट, टीव्ही सीरिज आणि कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. या वर्षी सर्वात जास्त लक्ष वेधले लिओनार्डो डी कॅप्रिओच्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ या चित्रपटाने. बेस्ट डायरेक्टर : पॉल थॉमस अँडरसन, बेस्ट स्क्रीनप्ले : पॉल थॉमस अँडरसन, बेस्ट फीमेल सपोर्टिंग अॅक्टर : टेयाना टेलर इत्यादी पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
बेस्ट मेल एक्टर (मोशन पिक्चर-म्यूजिकल कॉमेडी)- टिमोथी चालमेट (मार्टी सुप्रीम)
बेस्ट मेल एक्टर (टेलीविजन ड्रामा)- नोआ व्हाइल (द पिट)
बेस्ट मेल एक्टर (टीव्ही लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज, टीव्ही मोशन पिक्चर)- स्टीफन ग्राहम (एडोलसेंस)
बेस्ट एक्ट्रेस- रोज बायरन (इफ आय हॅड लेग्स आय वुड किक यू)
बेस्ट मेल एक्टर (टेलीविजन-म्यूजिकल/कॉमेडी)- सेठ रोजेन (द स्टूडियो)
बेस्ट सॉन्ग मोशन पिक्चर- गोल्डन (के-पॉप डेमन हंटर्स)
बेस्ट मेल एक्टर (टेलीविजन - म्यूजिक/कॉमेडी)- डेव फ्रेंको और जोई क्राविट्ज
बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर (मोशन पिक्चर)- स्टेलन स्कार्सगार्ड (सेंटिमेंटल वैल्यू)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस (मोशन पिक्चर)- टेयाना टेलर (वन बॅटल आफ्टर अनदर)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस (टेलीविजन)- एरिन डोहर्टी (एडोलसेंस)
बेस्ट नॉन इंग्लिश लैंग्वेज मोशन पिक्चर- द सीक्रेट एजेंट
बेस्ट डायरेक्टर- पॉल थामस एंडरसन
बेस्ट पॉडकास्ट- एमी पोहलर (गुड हँग विद एमी पोहलर)
बेस्ट एनिमेटेड फिल्म- के. पॉप डेमन हंटर्स
बेस्ट स्क्रीनप्ले- वन बैटल आफ्टर अनदर
बेस्ट स्कोर मोशन पिक्चर- लुडविग गोरान्सन (सिनर्स)
बेस्ट परफॉर्मंस स्टैंडअप कॉमेडी टेलीविजन- रिकी गेरवाइस
बेस्ट सिनेमैटिक एंड बॉक्स ऑफिस अचीवमेंट- द सिनर्स
बेस्ट पिक्चर (म्यूजिकल एंड कॉमेडी)- वन बॅटल ऑफ्टर अनदर
बेस्ट एक्टर मोशन पिक्चर ड्रामा- वॅगनर मौरा (द सीक्रेट एजेंट)
बेस्ट फीमेल एक्टर मोशन पिक्टर ड्रामा- जेसी बकले (हैमनेट)
बेस्ट म्यूजिकल/कॉमेडी सीरीज- द स्टूडियो
या सोहळ्यात प्रियांका चोप्रा-जोनासचा फॅशन सेंस आणि पती निक जोनास सोबतचे बाँडिंग चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले. प्रियांका या कार्यक्रमात अॅवॉर्ड अनाउंसरही होती. यंदा कोणत्याही भारतीय कलाकाराला किंवा चित्रपटाला विजेतेपद मिळाले नाही. यंदा भारतातून पायल कपाडिया यांचा चित्रपट ऑल वी इमेजिन एज लाइट नॉमिनेशनमध्ये होता.