

GoT star in Bengaluru
बेंगळुरू : जगप्रसिद्ध ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमधील ‘जेमी लॅनिस्टर’ ही भूमिका साकारणारा डॅनिश अभिनेता निकोलाज कोस्टर-वाल्डौ याने नुकतीच बेंगळुरूमधील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे ला भेट दिली आणि स्थानिक चाहत्यांसाठी हे क्षण अविस्मरणीय ठरले.
निकोलाज कोस्टर-वाल्डौ हा अत्यंत साध्या वेशात, काळ्या शर्ट आणि कॅप घालून रामेश्वरम कॅफेत दिसून आला. त्याने आपल्या दोन सहकाऱ्यांसह पारंपरिक दक्षिण भारतीय न्याहारी – इडली, डोसा आणि सांबारचा मनसोक्त आस्वाद घेतला.
व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
‘@thehappeninglifestyle’ या इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर शकीरा हिने स्वतःचा व्हिडिओ शूट करताना हा खास क्षण अनाहूतपणे कॅमेऱ्यात टिपला. व्हिडिओमध्ये निकोलाज अचानक पार्श्वभूमीत दिसताच ती थक्क झाली. यानंतर तिने त्याच्यासोबत सेल्फीही घेतली.
“मी रामेश्वरम कॅफेमध्ये शूट करत होते आणि अचानक माझ्या मागे गेम ऑफ थ्रोन्समधील जेमी लॅनिस्टर उभा होता – हा माझ्यासाठी स्टार-स्ट्रक क्षण होता!” – असे शकीराने कॅप्शनमध्ये लिहिले.
रमेश्वरम कॅफेकडून खास पोस्ट
रमेश्वरम कॅफेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून देखील त्याच्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले. त्यांनी लिहिले –“राजाजीनगर येथील रमेश्वरम कॅफेमध्ये आज एका खऱ्या आंतरराष्ट्रीय ताऱ्याचे स्वागत करण्याचा सन्मान मिळाला. आम्ही अत्यंत आनंदी आहोत की निकोलाज कोस्टर-वाल्डौ आणि त्याच्या टीमने आमच्यासोबत हा खास दिवस घालवला!”
सोशल मीडियात प्रतिक्रिया....
निकोलाज कस्टर-वॉल्डो याला ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील भूमिकेसाठी दोन वेळा प्राईमटाईम एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.दरम्यान, या भेटीनंतर सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.
एका युजरने लिहिले, "किंग्ज लँडिंगपासून थेट बंगलोरपर्यंत, ओएमजी!"
दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, "ओएमजी, हा तर 'किंग्सलेयर' आहे."
तिसऱ्याने लिहिले आहे की, "रामेश्वरम् कॅफेमध्ये जायचा खरा क्षण हाच असता."
चौथ्याने विचारले आहे की, "अरे, तो कुठे सापडला? सर्सीबद्दल विचारलेस का?"
गेम ऑफ थ्रोन्समध्ये सर्सी ही भूमिका लेना हेडे या अभिनेत्रीने साकारली होती. ती जेमी लॅनिस्टरची बहिण असते तरीही तिचे त्याच्याशी लैंगिक संबंध असतात.
‘किंग अँड कॉन्करर’ मध्ये मुख्य भूमिका
निकोलाज कोस्टर-वाल्डौ ‘गेम ऑफ थ्रोन्स’नंतर आता बीबीसीच्या आगामी ऐतिहासिक मालिका ‘King and Conqueror’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचा ट्रेलर 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर तो Jennifer Garner सोबत ‘The Last Thing He Told Me’ या मालिकेतही झळकणार आहे.
ही भेट केवळ एका कॅफेमधील क्षणापुरती मर्यादित नव्हती, तर ती चाहत्यांसाठी एक ‘सुरप्राईज ट्रीट’ ठरली. भारतातील चाहत्यांशी आपुलकीने वागणाऱ्या जागतिक कलाकारांची ही उदाहरणं आजच्या सोशल मिडियाच्या युगात आठवणीत राहतील.