

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन सुनील ग्रोवर ( Sunil Grover ) 'द कपिल शर्मा शो' या मालिकेतून चाहत्यांना मनमुराद खळखळून हसवत असतो. यासोबत सुनील सोशल मीडियावरदेखील अपडेट देवून चाहत्याच्या संपर्कात राहत असतो. सध्या सुनिल यांचा 'मेरा दिल ये पुकारे आ जा' गाण्यासोबत एक अफलातून व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक अनोखी धमालमस्ती पाहायला मिळतेय.
कॉमेडियन सुनील ग्रोवर ( Sunil Grover ) याने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर फनी व्हिडिओ शेअर केला आहे. यात गोरीलाचे एक लहान पिल्लू तारांच्या जाळ्यात बंद असून त्याच्यासमोर एक व्यक्ती पाहायला मिळतोय. यातील खास म्हणजे, त्या गोरीलाच्या पिल्लाने जाळ्यातून बाहेरील व्यक्तीच्या डोक्यावरील केसांना घट्ट पकडले आहे. काही केल्या त्याच्या तावडीतून व्यक्तीला त्याची सोडवणूक करता येत नाही. समोरची व्यक्ती खूपच त्याच्या हातातून डोक्याचे केस सोडवण्याचा प्रयत्न करते. परंतु, गोरीला काही केल्या केस सोडत नाही. नंतर मात्र, जोरात ओढल्यानंतर त्याच्या तावडीतून व्यक्तीची सुटका होते. हा फनी व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असल्याने चाहते पोट धरून, खळखळून हसत आहेत.
या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'मेरा दिल ये पुकारे आजा' हे हिंदी गाण्याचे बोल वाजत आहेत. याशिवाय यात गोरीलाच्या मागे डोंगराची कडा दिसतेय. यावेळी व्यक्तीच्या आजूबाजूला काही पर्यटक आणि लोकदेखील दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियवर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'केसांना गोरिलाने स्ट्रेट केले आहे' आणि 'कशाला दुसऱ्याची चेष्टा करायची' असे म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास एक लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचलंत का?