मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडची 'फिटनेस क्वीन' मलायका अरोराचा आज ४७ वा वाढदिवस. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायका इतकी फिट आहे. तुम्हाला माहिती आहे का, मलायकाचे फिट राहण्यामागे कोणते रहस्य आहे? तर मग तुम्हाला ही माहिती वाचायलाच हवी.
मलायकाने चाळीशी ओलांडल्यानंतरही आणि एका मुलाची आई असतानाही ज्या प्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे, ते कौतुकास्पद आहे.
मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही गोष्टी सांगितल्या होत्या.
तिने म्हटले होते की, मागील एक वर्षात तिने वेगन डाएट फॉलो केलं. (दुधापासून बनवलेले पदार्थ न खाणे). त्याचबरोबर ती शरीरात व्हिटॅमिन्सचा अभाव होऊ नये, याकडेही लक्ष देते. ती घरातीलच जेवण खाते. तूप तिला आवडतं. तिचे सर्व जेवण तूप, ऑलिव ऑईल किंवा नारळ तेलात बनते.
जर मलायका घराबाहेर वा परदेशात असेल तर तिला लोकल जेवण खाणे आवडते. शाकाहारी जेवण उपलब्ध असते, तेच खाते.
मलायका फिगरला मेंटेन करण्यासाठआ योगा करते.
जिममध्ये घामही गाळते. त्याचबरोबर, डाएटिंगदेखील फॉलो करते.
ती जिममध्ये तीन दिवस वेट लिफ्टिंग करते. फिट राहण्यासाठी मलायका जिममध्ये तासनतास एक्सरसाईज करते.
ती आपले जिममधील फोटोज व व्हिडिओजदेखील नेहमी सोशल मीडियावर शेअर करते.
याची सुरुवात सूर्य नमस्कारापासून होते. यानंतर ती मेडिटेशन करते. अष्टांग विन्साया योग तिचे फेवरेट आहे. सायंकाळी साडे सहा वाजता ती जेवते. ती शाकाहारीदेखील आहे.
आपल्या डाएटमध्ये मलायका अरोरा मिक्स फ्रूट्स, इडली, अंडे, मल्टीग्रेन टोस्ट, पोहा, वेजिटेबल ज्यूस, ब्राउन राईस, रोटी-सब्जी, स्प्राउट का सलाद, प्रोटीन शेक, भाज्या आणि सॅलॅडसोबत सूप घेते.