

बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या आपल्या आगामी रोमँटिक ड्रामा फिल्म ‘गुस्ताख इश्क’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल चांगलाच उत्साह असून, प्रमोशनदरम्यान फातिमाने तिच्या आयुष्यातील एक गोड आठवण शेअर केली आहे.
एका मुलाखतीत फातिमाने तिच्या पर्सनल लाइफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात तिने तिच्या पहिल्या क्रशविषयीही मजेशीर खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, ‘लहानपणी मला आमच्या मॅथ्स टीचरवर क्रश होता. बेल वाजल्यानंतर ते क्लासमध्ये येतील, या क्षणाची मी आतुरतेने वाट बघायचे. ते क्लासमध्ये बसलेले असताना मी त्यांच्याकडे पाहतच राहायचे. मी तेव्हा खूप कच्ची होते, त्यामुळे अभ्यासात काय चाललंय हेच कळायचं नाही. त्यांचा ओरडादेखील मजेशीर वाटायचा.’ फातिमा सना शेख आणि विजय वर्मा यांचे पहिलेच कोलॅबोरेशन असलेली ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. यात नसीरुद्दीन शाह, शारिब हाश्मीदेखील आहेत. चित्रपटातील पहिले गाणे ‘उल जलूल इश्क’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.