पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिध्द फॅशन डिझायनर रोहित बाल यांचे आज नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. फॅशनच्या विश्वात त्यांचे नाव विख्यात होते. त्यांना ह्रदयासंबंधित आजाराचे निदान झाले होते. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या लॅक्मे फॅशन विकमध्ये त्यांनी आपली कलेक्शन सादर केली होती. बॉलीवूड सेलीब्रेटींमध्ये त्यांनी डिझाईन केलेले कपडे विषेश प्रसिद्ध होते. देशासह विदेशातही त्यांचे नाव प्रसिद्ध होते.