Elvish Yadav | यूट्यूबर एल्विशवर ईडीची छापेमारी

यूट्यूबर एल्विशवर ईडीची छापेमारी
Elvish Yadav
एल्विश यादव Instagram
Published on
Updated on

पानिपत : ईडीने प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी - २ चा विजेता एल्विश यादव आणि हरियाणी गायक फाजिलपुरिया यांच्यावर कारवाई केली आहे. सापाच्या विषाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडातील गौतम बुद्धनगर जिल्हा पोलिसांनी एल्विश आणि त्याच्याशी संबंधित सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्राची दखल घेत ईडीने मे महिन्यात हा गुन्हा नोंदवला होता. ईडीने एल्विशची ५ सप्टेंबर रोजी ८ तास चौकशी केली होती. यासोबतच त्याचा मित्र गायक राहुल यादव ऊर्फ राहुल फाजिलपुरिया याचीही चौकशी करण्यात आली. ईडीने यापूर्वी ऑगस्टमध्येही एल्विशची दोनदा चौकशी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news