Dwayne Johnson | ‘द रॉक’चेही वाहतूक पोलिसांनी कापले चलान, अमेरिकेत नियम सर्वांना सारखेच! (video)

सुपरस्टार ड्वेन जॉनन्सननेही आपल्या वाहनावर लावलेला दंड कोणताही ड्रामा न करता भरला, खिडक्यांवरी फिल्म अधिक गडद असल्याने कारवाई
Dwayne Johnson
Dwayne Johnson
Published on
Updated on

Dwayne Johnson’s आपल्याकडे भारतात कोणत्‍याही नेता, व्हिआयपी, किवा चित्रपटस्टार प्रवास करत असला तर त्‍याच्या पाठी पुढे मोठा कॅनव्हॉय असतो. या गाड्यांना थांबवण्याचे धाडस येथील वाहतूक पोलिसांत नसते कारण आपली सिस्टिमच अशी डेव्हलप झाली आहे. पण अमेरिकेत मात्र कायदा नियम सर्वांनाच समान असल्याचे एका घटनेने दिसून आले आहे.

हॉलीवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉन्सन ऊर्फ द रॉक याचे जगभरात चाहते आहेत. याच रॉकला आता वाहनाचे नियम न पाळल्याने लॉस एंजेलिसमध्ये वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवून दंडात्मक कारवाई केली. ड्वेन जॉन्सन आपल्या कारमधून जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले आणि वाहन तपासणी केली. रॉकनेही कोणताही ड्रामा न करता पोलिसांना सहकार्य केले. एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे त्‍याने पोलिसांनी सांगितलेल्या गोष्टी एकत चलान भरले. ही घटना गेल्या आठवड्यात घडली.

रॉकच्या कारची काच नियमांपेक्षा अधिक गडद

मिळालेल्या माहितीनुसार, ड्वेन जॉन्सन हे त्यांच्या मित्र आणि सह-कलाकार एमिली ब्लंट आणि स्टॅनली टुची यांच्या 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम' सन्मान सोहळ्यानंतर परतत होते. यावेळी लॉस एंजेलिस पोलिसांनी त्यांच्या गाडीला थांबवले. ड्वेन जॉन्सन यांच्या गाडीच्या खिडक्यांच्या काचांना असलेल्या 'टिंटेड फिल्म' (Tinted Windows) नियमापेक्षा जास्त गडद असल्याने ही कारवाई करण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या वाहतूक नियमांनुसार, गाडीच्या काचांवर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त डार्क फिल्म लावण्यास मनाई आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की, द रॉकने अत्यंत संयमाने आणि नियमांचे पालन करत पोलिसांशी संवाद साधला. त्यांनी गाडीतून खाली उतरून पोलिसांना आवश्यक कागदपत्रे दाखवली आणि दंडात्मक कारवाई शांतपणे स्वीकारली. कोणत्याही प्रकारचा वाद न घालता त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पूर्ण सहकार्य केले.

एका मोठ्या सुपरस्टारने अशा प्रकारे ट्रॅफिक नियमांचे पालन केल्याचे पाहून चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. "जेव्हा नियम सर्वांसाठी समान असतात, तेव्हा सुपरस्टार असो वा सामान्य नागरिक, प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे," अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news