भारताच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेली ही ६ गाणी तुम्हाला माहिती आहेत का?

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॉमेडी व्हिडिओपासून, ट्यूटोरियलपर्यंत व्हाया फिल्म, आकर्षक गाण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात सोपं माध्यम कुठलं असेल तर ते युट्यूब. गुगलच्या मालकीचा हा ऑनलाईन व्हिडिओ प्लॅटफॉर्म असं माध्यम आहे जे असंख्य वेळा अब्जावधी लोकांच्या मनोरंजनाचं साधन बनला आहे. २००५ मध्ये युट्यूबच्या निर्मितीनंतर या प्लॅटफॉर्मवर अशी काही गाणी आहेत जी भारताच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेली आहेत. (आता भारताची लोकसंख्या किती हे एकदा आठवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल.) चलातर या गाण्यांची आज आपण चर्चा करूया…. 

१. डेस्पासीतो…

हळू हळू हलवा दांडा… पाणी थोडं थोडं सांडा… हे मराठी गाणं माहितीय काय? लक्ष्मिकांत बेर्डेच्या 'चंबू गबाळे' या चित्रपटातलं हे गाणं आहे. पण आपल्याला इथं त्या गाण्याची चर्चा करायची नाहीय. फक्त एवढच सांगायचंय की यात सुरुवातीला जे 'हळू हळू' हे शब्द वापरले आहेत त्याचा अमेरिकन स्पॅनिश भाषेत 'डेस्पासितो' असा अर्थ होतो आणि याच 'डेस्पासितो' गाण्यानं युट्यूबवर आजपर्यंत सर्वाधिक ७.२ अब्ज व्ह्यूज मिळवले आहेत. पोर्टो रीको (उत्तर अमेरिकेतील एक कॅरेबियन देश)चा गायक लुई फोंसी आणि रॅपर डॅडी यांकी यांचं हे गाणं आहे. १२ जानेवारी २०१७ मध्ये यूनिवर्सल म्यूझिक लॅटिनने "डेस्पासीतो" आणि त्याचा म्यूझिक व्हिडिओ प्रदर्शित केला होता. पोर्टो रीको देशातील ओल्ड सान जुआनच्या 'ला पेर्ला' परिसरात आणि तेथील स्थानिक बार 'ला फॅक्टोरिया'मध्ये या गाण्याचं चित्रीकरण झाले होते. हे गाण्याचे बोल फोंसी, एरिका एन्डर आणि और डॅडी यांकी यांचे आहेत. तर मॉरिसियो रेंगफो आणि एन्ड्रेस टॉरेस यांचे संगीत आहे. या गाण्यानं २०१७ मध्ये लॅटिन ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सॉन्ग ऑफ द ईयरचा मान पटकावला आहे. १७ एप्रिल २०१७ ला कॅनेडीअन गायक जस्टिन बीबर यानं फोंसीच्या 'डेस्पासीतो'च्या स्पॅनिश गाण्याला इंग्रजीत रीमिक्स केलं होतं. 

२. शेप ऑफ यू

'शेप ऑफ यू'…. इंग्लिश गायक-गीतकार एड शीरनचं हे प्रसिद्ध गाणं. ६ जानेवारी २०१७ ला एका डिजिटल डाऊनलोडच्या माध्यमातून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. शीरनंच्या स्टूडियो अल्बम २०१७ मधल्या 'डबल लीड सिंगल्स' आणि 'कॅसल ऑन द हिल' यानंतर शेप ऑफ यू हे तिसरं गाणं होतं.  आजपर्यंत या गाण्याला ५.२ अब्ज हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याने ६० व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात धमाका केला. सर्वोत्कृष्ट 'पॉप सोलो' या कॅटेगरीत या गाण्याची निवड झाली. 

अनेक गाणी अशी असतात की, ज्यात गायक-गायिका कॅमे-याच्या समोर गातात. पण 'शेप ऑफ यू' हे एक ४ मिनटाच्या फिल्म सारखं आहे. ज्यात एक ॲथलीट जोड्याची रंजक गोष्ट सांगते आणि गाणे केवळ पार्श्व संगीताप्रमाणे प्रेक्षक-श्रोता ऐकतो. फिल्म शैलीतील हा संगीत व्हिडियो कॉमन नाहीय. या व्हिडिओच्या माध्यमातून एक आकर्षक प्रेम कहानी आपल्या युट्यूबच्या स्क्रिनवर पहायला मिळते. 'शेप ऑफ यू'च्या व्हिडिओमध्ये काही मजेदार क्षण आहेत. ज्यात एड शीरन आणि एक सुमो पैलवाल अंतिम सामन्यात लढताना दाखवले आहेत. यात गाण्यातून एक सशक्त महिला सशक्तीकरणाचा संदेशही देण्यात आला आहे. 

३ 'सी यू अगेन' 

गायक विज खलीफा आणि चार्ली पथ यांचे 'सी यू अगेन' हे गाणं युट्यूबवर पाहिल्या गेलेल्या सर्वाधिक गाण्यांमध्ये तिस-या क्रमांकावर आहे. या गाण्याला आतापर्यंत ५ अब्ज हून अधिक व्हूज मिळाले आहेत. 'सी यू अगेन' गाणं २०१५ मध्ये प्रदर्शित झाले होते. ज्याला 'फास्ट अँड फ्यूरिअस ७' चित्रपटासाठी लिहिले गेले होते. या गाण्याची निर्मिती 'फास्ट अँड फ्यूरिअस' चित्रपटातील कलाकार पॉल वॉकरला श्रद्धांजली देण्यासाठी करण्यात आली होती. वॉकरचा 'फ्यूरियस ७' च्या शूटिंग दरम्यान २०१३ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. 'सी यू अगेन' गाण्याला सॉन्ग ऑफ द ईयर, बेस्ट पॉप डूओ/ ग्रुप परफॉर्मंससाठी निवडले गेले होते. 

४. जॉनी जॉनी येस पापा गाणं…

आपण बालपणात कधी साखर खाताना पकडला गेला आहात? तुमचे उत्तर होय असं अशू शकतं, कारण भारतीयांना मिठाई खाणं फार आवडतं आणि बालपणात आपल्याला मिठाई खाण्यास प्रतिबंध केला जातो. कारण काय सांगतात तर दात किडतात म्हणून. याच संदर्भातील एक प्रसिद्ध नर्सरी राईम आहे… जॉनी जॉनी एस पापा… ही नर्सरी राईम किंवा कविता आपल्या बालपणातील साखर खाण्याच्या 'त्या' दृश्यांना चित्रीत करते. युट्यूब चॅनल 'लोलो किड्स' वर असणा-या 'जॉनी जॉनी..' या नर्सरी राईमला आजपर्यंत ४.९ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.  

या नर्सरी राईमबद्दल इंटरनेटवर सर्च केले रंजक माहिती मिळते. विकीपीडियाच्या माहितीनुसार जॉनी जॉनी… हे नर्सरी राईम पहिल्यांदा जेसिका विल्सन यांनी 'कीनिया'मध्ये रेकॉर्ड केले. तर काही जाणकरांच्या मते इंटरनेटवर येण्याआधी जवळपास ६० वर्षांपूर्वी हे नर्सरी राईम गायले गेले आहे. तर यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा वर्ष २००९ मध्ये हे नर्सरी राईम अपलोड केले गेले. तर वर्ष २००७ मध्ये पहिल्यांदा याबाबत यूट्यूबवर फीचर बनवलं गेले होते. 

५. अपटाउन फंक

ब्रिटिश-अमेरिकन रेकॉर्ड निर्माता मार्क रॉनसनचे 'अपटाउन फंक' हे गाणं युट्यूबवर प्रसिद्ध आहे. रॉनसनचा चौथा स्टूडियो अल्बम अपटाउन स्पेशल जो २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यातील हे टायटल साँग आहे. यात गायक आणि गीतकार ब्रूनो मार्स आहे. हे गाणं १० नोव्हेंबर २०१४ मध्ये डाउनलोडच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले होते. 'अपटाउन फंक' गाण्याचे बोल रॉनसन, मार्स, फिलिप लॉरेंस आणि जेफ भास्कर यांनी लिहिले आहेत. गाणं रिलीज झाल्यानंतर त्याचा कॉपीराईटचा वाद निर्माण झाला होता. युट्यूबवर अपटाउन फंकच्या व्हिडिओला ४.१ अब्ज व्हूज मिळाले आहेत.

६. गंगनम स्टाईल

रिकॉर्डिंग कलाकार पापीचा 'गंगनम स्टाईल' गाण्याचा व्हिडियो सध्या सहावा सर्वाधिक पाहिला गेलेला गाण्याचा व्हिडिओ आहे. या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत ४ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचं दिग्दर्शन चो सू ह्यूनने केलं आहे. जुलै २०१२ मध्ये ४८ तासात या गाण्याचं शुटींग सियोलमध्ये पार पडलं होतं. त्यानंतर १५ जुलै २०१२ ला युट्यूबवर या गाण्याच्या व्हिडियोचा प्रीमियर झाला. तर १९ ऑक्टोबरला डिजिटल रूपात डाउनलोड करण्यास उपलब्ध करण्यात आले. डिसेंबर २०१२ मध्ये 'साय'च्या 'गंगनम स्टाईल' या गाण्याने युट्यूबवर क्रांती केली. युट्यूबवर एक अब्ज (बिलियन) व्ह्यूज मिळवणारा तो पहिला व्हिडिओ ठरला. पण पुढची अडीच वर्ष कुठलाच व्हिडिओ अब्जावधीचा टप्पा गाठू शकला नाही. त्यानंतर जस्टीन बिबरच्या 'बेबी' या गाण्यानं जून २०१५ मध्ये एक अब्ज व्ह्यूजचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news