National Film Award २०२४ सोहळ्याचे वितरण, 'गुलमोहर'साठी राहुल व्ही. चित्तेला तर..

नॅशनल फिल्म पुरस्कार सोहळ्याचे वितरण, 'गुलमोहर'साठी राहुल व्ही. चित्तेला तर...
National Film Award २०२४
नॅशनल फिल्म पुरस्कार सोहळ्याचे वितरण, 'गुलमोहर'साठी राहुल व्ही. चित्तेला तर... National Film Award २०२४
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत आज मंगळवार (दि ८ ऑक्टोबर ) रोजी नॅशनल फिल्म पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याच्या हस्ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी अभिनेता रजत कमल आणि 'गुलमोहर' चित्रपटासाठी राहुल व्ही. चित्तेला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना नॅशनल फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा सातवा नॅशनल फिल्म पुरस्कार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी अभिनेता रजत कमल याला पुरस्कार मिळाला. 'गुलमोहर' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर पटकथा आणि लेखक राहुल व्ही. चित्तेला यांना 'गुलमोहर'साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा नॅशनल फिल्म पुरस्कार मिळाला.

'KGF Chapter २' ला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. 'पोनियान सेल्वन २' साठी पुरस्कार अभिनेता मणिरत्नम यांनी स्विकारला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तेलगू चित्रपट 'कार्तिकेय २' साठी अभिनेता अभिषेक अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आहे. तर दुसरीकडे या सोहळ्यात 'गुलमोहर' ला विशेष पसंती मिळाली. हा पुरस्कार घेण्यासाठी मनोज बाजपेयी आले होते. अजून काही दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

या दिमाखदार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती, निर्माता करण जोहर, ए.आर रहमान, नीना गुप्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. हाताला दुखापत झाल्याने मिथुन चक्रवर्ती हे हाताला पट्टी बांधून समारंभात आले होते.

National Film Award २०२४
National Film Award 2023 : RRR साठी किंग सोलोमन यांना तर 777 Charlie साठी रक्षित शेट्टी यांना राष्ट्रीय पुरस्कार (Video)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news