

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ काही महिन्यांपासून त्याच्या 'दिलुमिनाटी' दौऱ्यामुळे चर्चेत आहे. भारतापूर्वी त्यांनी अमेरिका, लंडन आणि इतर अनेक ठिकाणी कॉन्सर्ट केले, ज्यासाठी त्यांना खूप प्रेम मिळाले. मात्र, भारतात हा दौरा सुरू होण्यापूर्वीच गायक दिलजीत वादात सापडला होता. आता त्याच्या हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या शोदरम्यान सरकारने त्याला काही गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी नोटीस पाठवली होती, ज्यावर गायकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिलजीत दोसांझने गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान तेलगंणा सरकार काढलेल्या नोटीसला मजेशीर प्रत्युत्तर दिले. दारू, ड्रग्स आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी सादर करू नयेत अशा तेलंगणा सरकारच्या नोटीस पाठवली होती. यावर बोलताना तो म्हणाला, "माझे शो जिथे असतील तिथे ड्राय डे घोषित करा. त्यामुळे मी अल्कोहोलशी संबंधित गाण्यांपासून दूर राहीन. तसेच माझ्यासाठी माझ्या गाण्याचे बोल बदलणे सोपे आहे."
दिलजीत गुजरातमधील कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर म्हणाला, आनंदाची गोष्ट म्हणजे आज मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आजही मी दारूवर कोणतेही गाणे गाणार नाही. मी दारूवर गाणी गाणार नाही कारण गुजरात हे कोरडे राज्य आहे. गायक पुढे म्हणाला की बॉलीवूडमध्ये दारूवर हजारो गाणी बनली आहेत, मी जास्तीत जास्त 2 ते 4 गाणी बनवली आहेत आणि आता मी तीही गाणार नाही, कोणतेही टेन्शन नाही. माझ्यासाठी हे अवघड काम नाही कारण मी स्वतः दारू पीत नाही आणि बॉलीवूड कलाकारांप्रमाणे दारूची जाहिरातही करत नाही.