मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहते. गेल्या १५ फेब्रुवारीला दियाने वैभव रेखीसोबत लग्न केले आणि त्यानंतर लगेच दीड महिन्यानंतर तिने मालदीवमधील बेबीबंपचे फोटो शेअर करत गुड न्यूज दिली. यानंतर मात्र, दियाला तिच्या प्रेग्नेंसीबद्द्ल चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. दियाने सध्या या युजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
मालदीवमधील बेबीबंपचे फोटो पाहून एका युजर्सने दियाला विचारले की, लग्नाआधीच तू आई होणार असल्याचे का सांगितले नाहीस असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना दिया म्हणाली की, 'खूपच रोमांचक प्रश्न आहे. पहिले तर हे समजून घ्या की, आपण लग्न काय मुले पाहिजे म्हणून करत नसतो. तर लग्न आपण एकमेकांच्या सहमतीने करत असतो. कारण आपल्याला एकत्रित जीवन जगायचे असते. जेव्हा मी लग्नचा प्लॅन करत होते तेव्हाच मी प्रेग्नेंट असल्याचे समजले. लग्नाचा प्लॅन आमचा आधीपासूनचा होता. लग्नाचा आणि माझ्या गरोदरपणाचा काही संबंध नाही.'
वाचा : मीरा कपूरचा बोल्ड स्विम सूटमधील लूक व्हायरल
यापुढेही दिया म्हणते, 'प्रेग्नेंसी मेडिकली सेफ असल्याचे सांगत नाही तोपर्यंत आपण घोषीत करू शकत नाही. ही माझ्या जीवनातील सर्वात आनंदाची गोष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी याची वाट पाहत होते. कोणत्या कारणामुळे मी माझी प्रेग्नेंसी लपवू?' असा उलट प्रश्नदेखील दियाने केला.
वाचा : लव्ह सुलभ फेम प्रियदर्शन जाधव कोरोना पॉझिटिव्ह
दिया मिर्झाने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोतच दिया मिर्झाचे बेबीबंप दिसले. यानंतर युजर्सनी दियाला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती.
(photo : diamirzaofficial instagram वरून साभार)