मुंबई : पुढारी ऑनलाईन
नुकतचं दीड महिन्यापूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाने खास मित्र आणि उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातीलच एका फोटोने चर्चेला उधाण आले. आणि ती चर्चा अखेर खरी ठरली.
दिया मिर्झाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. दिया मिर्झाने लग्नानंतर दीड महिन्यांतच गुड न्यूज दिली आहे. आपल्या चाहत्यांसह तिने आपला हा आनंद शेअर केला आहे. बेबी बम्पसह दियाने आपला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दिया आणि वैभव एकमेकांचे खास मित्र. त्यांच्या मैत्रीचं रूपांत प्रेमात झालं, अनेक वर्षे ते नात्यात होते. अखेर १५ फेब्रुवारी, २०२१ मध्ये तिने लग्नगाठ बांधली. दियाचा लग्नसोहळाही चांगलाच चर्चेत होता. दियाच्या लग्नाच्या विधीही महिला पुजाऱ्यानं केल्या.
दिया आणि वैभव दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. दिया मिर्झाचा पहिला विवाह साहिल संघा यांच्याशी झाला होता. दिया आणि साहिल हे अनेक वर्षं एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी ते विवाहबद्ध झाले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती.