पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. प्रसूतीच्या 9व्या महिन्यात असलेली दीपिका आता ॲडमिट होण्यासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. ही बातमी समोर येताच दीपिकाचे चाहते बाळाच्या जन्माच्या गुड न्यूजने उत्साहित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पुढील दोन दिवसांमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते. तिची डिलिव्हरीची तारीख या महिन्यात आहे असे रणवीर सिंगने एका सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये सांगितले होते. (Deepika Padukon)
शुक्रवारी (दि.6) दीपिका पदुकोणने तिचा पती रणवीर सिंगसोबत मुंबईत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दीपिकाने काल सिद्धिविनायक मंदिरात माथा टेकवून श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले होते. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ती रुग्णालयात दाखल होण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पोहोचली आहे.
सेलेब्स फोटोग्राफर पल्लव पालीवाल यांनी त्यांच्या कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये दीपिका हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दीप-वीर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (Deepika Padukon)
दीपिका पदुकोणने नुकतेच पती रणवीर सिंगसोबत मॅटर्निटी फोटोशूट केले. ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणवीर आणि दीपिकाचे 2018 साली लग्न आहे, आता लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपे त्यांच्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. (Deepika Padukon)