अभिनेत्री चित्राच्या पतीला अटक, गंभीर आरोप
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
तमिळ टीव्ही अभिनेत्री वीजे चित्राचा (Actress Chitra vj) चेन्नईत नसरपेट येथील हॉटेलच्या एका खोलीत मृतदेह आढळला होता. वीजे चित्रा २९ वर्षांची होती. हॉटेलच्या रूममध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी चित्राच्या होणाऱ्या पतीला अटक केली आहे.
वाचा – तमिळ टीव्ही अभिनेत्री चित्रा व्हीजेची आत्महत्या; हॉटेलच्या रूममध्ये मिळाला मृतदेह
दरम्यान, जावयानेच चित्राची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीमुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) मध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या सांगण्यात आले आहे.
चित्रा रात्री उशीरा अडीच वाजता शूटिंग केल्यानंतर हॉटेलला परतली होती. ती हॉटेलमध्ये तिच्या होणाऱ्या पतीसोबत होती. तिने चेन्नईतील एक मोठे उद्योगपती हेमंत रविसोबत साखरपुडा केला होता. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, चित्रा डिप्रेशनमध्ये होती, त्यामुळेचं तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे.
वाचा – अभिनेत्री चित्रा आत्महत्या करण्याच्या १२ तास आधी काय घडलं? शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलंय…
एका टीव्ही चॅनेलच्या माहितीनुसार, हेमंतने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितलं होतं की, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर चित्रा म्हणाली की ती आंघोळीला जातेय. परंतु, खूप उशीरा ती बाहेर आली नाही. यानंतर त्यांनी हॉटेलच्या स्टाफला याची माहिती दिली. जेव्हा डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला तेव्हा सीलिंगला तिचा मृतदेह लटकलेल्या अवसेथेत आढळला होता.
