सैफ अली खानला चाकूनं ६ वेळा भोसकलं, २ जखमा खोलवर, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Saif Ali Khan Attacked | सैफवर हल्ला, पोलीस ॲक्शन मोडवर
Saif Ali Khan Attacked
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरी मध्यरात्री चाकू हल्ला झाला. (File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरी मध्यरात्री चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील मोलकरणीशी वाद घालू लागला. यादरम्यान सैफने मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी त्याचे कुटुंबीय होते.

एक जखम त्याच्या मणक्याजवळ

दरम्यान, सैफच्या प्रकृतीबद्दल लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी सांगितले, “सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याच्या शरिरावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने केलेल्या सहा जखमा आढळून आल्या आहेत. त्यातील दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. त्यांच्यावर सध्या कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन, कन्सल्टंट अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कविता श्रीनिवास, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ. मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती दुखापत झाले आहे हे समजून येईल.”

Saif Ali Khan Attacked | नेमकं काय घडलं?

सैफ याच्यावरील हल्ल्याची घटना गुरुवारी वांद्रे (पश्चिम) येथील अकराव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटमध्ये घडली. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घुसून सैफवर चाकूने वार केले. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, सैफ झोपेतून जागा झाल्यावर संशयिताने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर तो पळून गेला.

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सैफला त्यांचा मोठा मुलगा इब्राहिम आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी वांद्रे रिक्लॅमेशन येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले. "त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सहा जखमा आढळून आल्या आहेत," असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले.

तिघेजण ताब्यात

पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, सैफच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. सैफ आणि घरात घुसलेली व्यक्ती यांच्यात झटापट झाली. त्यात सैफ जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news