नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं. बंगळूर येथील रुग्णालयात फराज यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाशी लढत होते.
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'फरेब' या चित्रपटातून फराज खान यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. पृथ्वी, दुल्हन बनू में तेरी, चाँद बुझ गया असे चित्रपट तर वन प्लस वन, शूsssss कोई है, रात होने को अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.
राणी मुखर्जी सोबत त्यांनी मेहंदी या चित्रपटात भूमिका साकारली होती.