Bigg Boss Marathi-6| राखीच्या गळ्यावर राकेशच्या नावाचा टॅटू? 'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचा नवा ड्रामा, बघणारे म्हणाले...

Bigg Boss Marathi-6| राकेश बापटने रेड हार्टचा टॅटू काढला राखीच्या गळ्यावर! बघणारे म्हणाले...
image of rakhi sawant-raqesh bapat
Bigg Boss Marathi-6 updates instagram
Published on
Updated on
Summary

'बिग बॉस मराठी ६' मध्ये राखी सावंत आणि राकेश बापट यांची जोडी रोज काहीतरी नवीन राडा किंवा रोमान्स करताना दिसते. नुकत्याच झालेल्या भागात, राकेशने एका मजेशीर अंदाजात राखीच्या गळ्यावर लाल रंगाचा हार्ट टॅटू काढला. हे पाहून राखी प्रचंड खुश झाली मात्र, घरातील इतर सदस्य दोघांकडे पाहतच राहिले.

Bigg Boss Marathi-6 latest updates

'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक सीझनमध्ये एखादी जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते, पण सीझन ६ मध्ये राखी सावंत आणि राकेश बापट यांची 'अजब-गजब' जोडी सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या जोडीमध्ये आता 'टॅटू'मुळे नवीन चर्चा रंगली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका भागात राकेश बापट चक्क राखी सावंतच्या गळ्यावर लाल रंगाच्या पेनाने हार्टचा टॅटू काढताना दिसला.

image of rakhi sawant-raqesh bapat
Bharti Singh little boy Kaju|भारती सिंहने दाखवला ‘काजू’चा पहिला चेहरा; ‘गोले’च्या भावाचा क्यूटनेस ओव्हरलोड

नव्या प्रोमोमध्ये राखीच्या गळ्यावर राकेश बापट टॅटू काढताना दिसतो. राकेश रेड हार्टमध्ये आर अक्षर काढताना दिसतो. यावेळी संस्कृती, दीपाली सय्यद, रेवा सगळेच आवतीभोवती उभे असतात. या सर्वांच्या मध्ये राकेश बापट म्हणतो- 'राखी तुला हवाय म्हणून मी काढतोय टॅटू.. मध्येच राखी सावंत हसते... रेवा मात्र दोघांची मज्जा करताना दिसतेय. रेवा गाणे गुणगुणत राखीला म्हणते..हे माझचं आहे का आर(R). इतकं प्रेम झालंय तिला माझ्यासोबत...सगळे रेवाला म्हणतात की, तू दोघांना डिस्टर्ब करू नकोस...'

राखीचा आनंद गगनात मावेना

गेल्या काही दिवसांपासून राखी राकेशच्या मागे हात धुवून लागली होती. राकेशने मात्र सुरुवातीला तिला टाळण्याचा प्रयत्न केला. पण आता राकेशचा सूर बदललेला दिसतोय. त्याने राखीच्या गळ्यावर हा टॅटू काढल्यानंतर राखी अत्यंत लाजत होती.

image of rakhi sawant-raqesh bapat
Movie Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिली झलक; 'धुरंधर २' पाहणाऱ्या प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राईज!

काही दिवसांपूर्वी, राखीने राकेशवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी राकेशने देखील हो म्हणत प्रेमाची कबुली दिली होती. त्याआधीही राखी राकेश सोबत फ्लर्ट करताना दिसली होती. आता नव्या टॅटूची चर्चा बिग बॉसच्या घरात रंगलीय.

एकूणच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये राखी आणि राकेशचा हा 'टॅटू रोमान्स' सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, येणाऱ्या 'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये रितेश देशमुख यावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news