आता मेणबत्ती नाही तर..भूषणच्या 'पुन्हा एकदा चौरंग' चा टिझर पोस्टर प्रदर्शित

Punh Aekda Chaurang : आता मेणबत्ती नाही तर..भूषणच्या 'पुन्हा एकदा चौरंग' चा टिझर पोस्टर प्रदर्शित
Punh Aekda Chaurang Film
आता मेणबत्ती नाही तर..भूषणच्या 'पुन्हा एकदा चौरंग' चा टिझर पोस्टर प्रदर्शितPunh Aekda Chaurang
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीला ज्वलंत विषयावर वास्तवदर्शी चित्रपट बनवण्याची फार मोठी परंपरा आहे. आजवर अनेक सिनेमांनी समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला 'पुन्हा एकदा चौरंग' हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे. 'पुन्हा एकदा चौरंग' या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 'आता मेणबत्ती नाही, होईल तो चौरंग' असे म्हणत या चित्रपटाने जणू अन्यायाविरोधात एक लढाच पुकारला आहे.

आरोही फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते राजेंद्रकुमार गुलाबराव मोहिते आहेत. ज्योती राजेंद्रकुमार मोहीते सहनिर्मात्या आहेत. सागर दिनकरराव मोहिते यांनी दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. 'पुन्हा एकदा चौरंग' हे शीर्षक खऱ्या अर्थाने चित्रपटाचा रंग दाखवणारे आहे. ही लढाई न्याय-अन्यायाची असल्याचे पोस्टर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. 'आता मेणबत्ती नाही...' ही टॅगलाईन थेट ह्रदयाला भिडणारी आहे.

दिवसागणिक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हे चित्र पाहिल्यावर हाच आपला पुढारलेला, सुधारलेला, महिलांना समान वागणूक देणारा समाज का? असा प्रश्न कोणत्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. कोलकाता, बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायचे प्रतीक आहेत. अशा असंख्य घटना आहेत ज्या कधी उजेडात आल्याच नाहीत. अशी कितीतरी प्रकरणे आहेत जी सत्ता आणि पैशाच्या बळावर दाबली गेली आहेत. 'पुन्हा एकदा चौरंग'या चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे.

सुप्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून त्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. प्रदर्शित करण्यात आलेला टिझर खऱ्या अर्थाने 'पुन्हा एकदा चौरंग'ची झलक दाखवणारा आहे.

'पुन्हा एकदा चौरंग'मध्ये भूषण प्रधान आणि सौरभ गोखले हे दोन तगडे अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या जोडीला अरुण नलावडे, जयवंत वाडकर, सिद्धी पाटणे, लतिका सावंत, महेश कोकाटे, दिव्येश मेदगे, नितीन कुलकर्णी, वंदना सरदेसाई, डॉ विलास कुलकर्णी, मिलिंद दास्ताने, संतोष पाटील, राजभूषण सहस्त्रबुद्धे, बाळकृष्ण शिंदे, डॉ. बाळासाहेब केंडके, पंकज काळे, पुष्पा कदम, प्रसाद दबके, नीरज राठोड, ओमकार बोथटे, प्रथमेश काटकर, अमोल जाधव, सतीश तांदळे, किशन राठोड, विलास कदम यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सलोनी सातपुते, श्रद्धा नालिंदे, हर्षदा तोंडीलकर, प्रतीक्षा पगारे या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहेत.

छायांकन अनिकेत करंजकर यांनी तर संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. विरेंद्र केंजळे यांनी संगीत दिलं असून, विजय गावंडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. सिध्देश्वर नंदागवळे कार्यकारी निर्माता, तर नंदकुमार भगत लाईन प्रोड्यूसर आहेत. ध्वनिरेखन रमेश व्ही. इनामती यांनी केलं असून, केशव ठाकूर कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन रौनक ओसवाल यांनी केलं असून, प्रशांत नाईक या चित्रपटाचे फाईट मास्टर आहेत. व्ही.एफ.एक्स मुन्ना निंबाळ यांचे असून वेशभूषा धनश्री साळेकर यांनी केली आहे.

Punh Aekda Chaurang Film
Chitra Wagh vs Urfi Javed : ‘विरोध उर्फीला नाही, तर…’ चित्रा वाघ यांचा उर्फीवर पुन्हा एकदा हल्लाबोल (व्हिडिओ))

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news