Bhool Bhulaiyaa 3 | मंजुलिका राजाला फरफटत नेणार

मंजुलिका राजाला फरफटत नेणार
BhoolBhulaiyaa 3
भुलभुलैय्या ३Instagram
Published on
Updated on

अनेक महिन्यांपासून 'भूलभूलैय्या ३' या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा अभिनेता कार्तिक आर्यन भूतांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपासून 'भूलभूलैय्या-३' या सिनेमाचे पोस्टर समोर आली आहेत. याचदरम्यान 'भूलभूलैय्या-३' या सिनेमाचा टीझर रीलिज झाला आहे. पहिल्या भागात विद्या बालन हिला पछाडलेली मंजुलिका पुन्हा प्रेक्षकांचा थरकाप उडवण्यास सज्ज झाली असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. माझे सिंहासन कोणाला दिले? असे म्हणत संतप्त झालेली मंजुलिका एका राजाला फरफटत नेताना दिसत आहे. पुढे बंद दाराआड मंजुलिकाच्या रुपात विद्या खुर्ची हातात घेऊन आक्रोश करताना दिसत आहे. त्यानंतर सर्वत्र गुलाल उधळलेला दिसत आहे.

लाल रंगामध्ये हातात मशाल घेऊन संपूर्ण काळ्या कपड्यात कार्तिकची एंट्री होताना दिसत आहे. पुढे तृप्ती डिमरी रोमॅटिक अंदाजात बघायला मिळत आहे. अक्षय कुमार आणि मंजुलिकाचा थेट सामना 'भूलभूलेव्या' या सिनेमाच्या पहिल्या भागात बघायला मिळाला होता, आता विद्या 'भूलभूलैय्या-३' या सिनेमामध्ये पुन्हा भेटीला येणार आहे. विद्याला पछाडलेल्या मंजुलिकासोबत कार्तिक थेट भिडताना दिसणार आहे. या दिवाळीत 'भूलभूलैय्या-३' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news